सलमान आणि स्वतःच्या लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताचं सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर

सध्या अभिनेत्री सुष्मिता सेन उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.   

Updated: Jul 23, 2022, 03:39 PM IST
सलमान आणि स्वतःच्या लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताचं सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर title=

मुंबई : सध्या अभिनेत्री सुष्मिता सेन उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. ललित मोदीने सोशल मीडियावर सुष्मितासोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत 'एक्त एकमेकांना डेट करत आहोत...' अशी माहिती दिली. ललितच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर ललित आणि सुष्मिताच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. अखेर सुष्मिताने देखील ललित मोदीसोबत असेलेल्या नात्याचा स्वीकार करत, 'सध्या आजू-बाजूला प्रेम आहे...' अशी पोस्ट केली. 

अद्यापही ललित आणि सुष्मिताच्या नात्याच्या चर्चा रंगत असताना, अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुष्मिताला, 'नेहमी हा प्रश्न आम्ही सलमानला विचारतो, पण उत्तर कधीचं मिळत नाही. म्हणून आता तुला विचरतो, तुम्ही लग्न का नाही केलं?'

या प्रश्नाचं उत्तर देताना सुष्मिता म्हणाली, 'एकटेपणा साजरा करणाऱ्या दोन लोकांना तुम्ही प्रश्न विचारत आहात. आम्ही लग्न केलं नाही, याचा अर्थ असा नाही, आम्हाला कोणी भेटलं नाही. आम्हाला स्वतःच्या इच्छेने जगायला आवडतं.' सध्या सुष्मिताचा व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. 

सध्या सर्वत्र सुष्मिताच्या नात्याविषयी चर्चा रंगत आहेत. ललित मोदी आधी सुष्मिताने रणदीप हुड्डा, ऋतिक भसीन, सबीर भाटिया, वसीम अकरम आणि रोहमन शॉल यांना देखील डेट केलं आहे.