'आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट...', Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा

राखी सावंतनं तिचा पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिच्या पतीनं तिला धोका दिल्याचे राखीचे म्हणणे आहे. 

Updated: Feb 13, 2023, 12:17 PM IST
'आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट...', Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा title=

Rakhi Sawant Husband Adil's Girlfriend Is Pregnant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीनं आदिल खान दुरानीवर (Adil khan) गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, राखीनं आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राखीनं खुलासा केला होता की तिचा पती आदिल खान हा एका दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आता राखीनं त्या मुलीसोबत असलेल्या त्याच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे. 

राखीनं आदिल विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राखीनं त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि त्याचसोबत त्याच्या रिलेशनशिपविषयी मोठे खुलासे केले आहेत. राखीनं आता खुलासा केला आहे की आदिलची गर्लफ्रेंड तनु प्रेग्नंट आहे, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी बोलते की “आदिलला जामीन मिळालेला नाही. माझ्यासाठी तर सगळंच धक्कादायक आहे. आधी आदिलच्या लग्नाची बातमी आणि आता त्याची गर्लफ्रेंड तनु प्रेग्नंट आहे असं मला कळलं. त्यामुळे आदिल जेव्हा तुरुंगातून बाहेर पडेल तेव्हा तिच्याशी तो लग्न करणार आहे. याबद्दल मला फार काही माहीत नाही पण तनुने सर्वांसमोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे की ती प्रेग्नंट आहे की नाही. त्यासोबतच मला मुंबई पोलीस, भारतीय पोलीस, म्हैसूर पोलीस यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांच्यामुळे एवढी मोठी गोष्ट समोर आली आहे.” (Adil Khan's Girl Friend is Pregnant?) 

हेही वाचा : स्वत:च्या इच्छेनं नव्हे, तर... ; आजपर्यंत अविवाहित का? या प्रश्नावर Salman Khan चा मोठा उलगडा

राखीनं आदिलवर मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप त्यानंतर रात्री त्याच्यासोबत डिनर डेटला गेली होती. यावेळी त्यांनी एकमेकांना घासही भरवला. या डिनर डेटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता काय तर राखीने आदिलवर गंभीर आरोप केले. आदिलने राखीला मारहाण केली आणि तिचे दागिने आणि पैसे घेतल्याचा आरोप तिने केला.आदिल खान दुर्रानी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे, असा आरोप करणारा राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची चर्चा सुरु असताना अदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटोही समोर आला.