Satyam Shivam Sundaram's Rupa Role Offered to Lata Mangeshkar : 1978 मध्ये जेव्हा राज कपूर यांचा 'सत्यम शिवम सुंदरम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा सगळीकडे त्याचीच चर्चा होती. लोकांनी या चित्रपटाचा विरोध केला. पण, हळू-हळू या चित्रपटाचा समावेश हा कल्ट चित्रपटांमध्ये झाला. या चित्रपटात अभिनेत्री झीनत अमन यांनी रुपा ही भूमिका साकारली होती. खरंतर, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे की झीनत अमान यांच्या आधी ही भूमिका गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना ऑफर केली होती. त्यावर लता मंगेशकरांनी काय ऑफर दिली होती हे जाणून घेऊया...
पत्रकार वीर सांघवी यांनी त्यांच्या पुस्तकात लता मंगेशकर यांच्याशी संबंधीत एक किस्सा शेअर केला आहे. तिच्याप्रमाणे, लता मंगेशकर यांना या चित्रपटाची कथा प्रचंड आवडली होती. त्या या चित्रपटात काम करण्यासाठी तयार देखील झाल्या होत्या, पण मग असं काही झालं की त्यांनी चित्रपटाला नकार दिला.
वीर सांघवी यांच्याप्रमाणे, राज कपूरनं लता मंगेशकरांशी या चित्रपटाला घेऊन चर्चा केल्यानंतर एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक दगड घ्या, तो दगड तोपर्यंतच दगड राहणार, जोपर्यंत त्याच्यावर कोणताही धार्मिन निशान लागणार नाही. जसं तुम्ही त्या दगडावर धार्मिक निशाण लावणार तर तो देव होईल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एक मधुर आवाज ऐकता तेव्हा तुम्ही त्याच्या प्रमात पडतात, पण जेव्हा तुम्हाला कळतं की त्या मधुर आवाजामागे एक कुरुप मुलगी आहे तर..., राज कपूर शांत झाले. त्यांना कळलं की ते काही तरी चुकीचं बोलले आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले की ते ही मुलाखत पब्लिश होण्यापासून कसं तरी थांबवू शकतील.
दरम्यान, असं झालं नाही. ही मुलाखत पब्लिश झाली आणि लता मंगेशकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी राज कपूर यांची मुलाखत वाचल्यानंतर चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर झीनत अमानला त्यांनी या चित्रपटात कास्ट केलं आणि त्यांनी या भूमिकेला अमर केलं.