कॉपी...? राधिका मर्चंटनं अनंतसाठी बोललेला प्रत्येक शब्द 'इथून' उचललेला सांगत नेटकऱ्यांकडून Video Viral

Radhika Merchant Pre Wedding Speech :  राधिका आणि अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात राधिकाकडून हे काय झालं...नेटकरी करतायत ट्रोल

दिक्षा पाटील | Updated: Mar 8, 2024, 12:05 PM IST
कॉपी...? राधिका मर्चंटनं अनंतसाठी बोललेला प्रत्येक शब्द 'इथून' उचललेला सांगत नेटकऱ्यांकडून Video Viral title=
(Photo Credit : Social Media)

Radhika Merchant Pre Wedding Speech : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांच्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम नुकताच पार पडला. गुजरातमध्ये झालेल्या या प्री-वेडिंगची चर्चा सगळीकडे सुरु होती. या कार्यक्रमात फक्त भारतातील नाही तर परदेशातील अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनी नाही तर अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं परफॉर्म केलं. त्याशिवाय त्यांनी अनंत आणि राधिकासाठी स्पीच दिलं. त्याशिवाय अनंत आणि राधिकानं एकमेकांसाठी स्पीच दिले. त्यावेळी राधिकानं देखील एक स्पीच दिलं. तिचं स्पीच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे राधिकानं तिच्या स्पीचमधील शब्द न शब्द हे एका चित्रपटातून चोरल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अंबानीच्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं आहे. 

सोशल मीडियावर राधिकाचा एक मर्चेंटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राधिका आणि अनंत अंबानी हे दोघेही स्टेजवर असल्याचे पाहायला मिळते. राधिकानं तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी काही प्रेमाचे शब्द सांगितले आहेत. पण तिचे हे शब्द तिचे नसून चित्रपटातील आहेत. आता तुम्हाला प्रश्न असेल की हा डायलॉग 'शैल वी डांस' या हॉलिवूड चित्रपटातील आहे. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुजन सरैंडनची भूमिका रिचर्ड जेनकिन्सशी बोलताना दिसते. या डायलॉगचं नाव 'विटनेस टु योर लाइफ' आहे. राधिकानं हे जसेच्या तसे शब्द प्री-वेडिंग कार्यक्रमात म्हटले. तर हा व्हिडीओ शेअर करत त्या नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं की आम्ही पाठलाग करत नाही, 'आम्ही तपास करतो. ते मला बोलवू शकत होते आणि मी खूप कमी कोटी घेऊन यातील शब्दांमध्ये बदल केले असते. नोट - ती टेलीप्रॉम्प्टरवर दिसत असलेलं वाचते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : राखी सावंतच्या Ex पती आदिल खानचं आणखी एक लग्न! फोटो शेअर करत म्हणाला, 'एक नवी सुरुवात...'

अशात आता राधिका मर्चंटची चोरी ही पकडली गेली असे म्हणतं नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यांनी तर एकदा त्या चित्रपटातील डायलॉग आणि दुसरीकडे राधिकाचं स्पीच असा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक नेटकरी राधिकाला ट्रोल करत म्हणाला की 'मोठे लोक आहेत, तरी कॉपी करतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता हिला आरामात चित्रपटांच्या ऑफर मिळतील.' तर काही नेटकऱ्यांनी राधिकाची बाजू घेतली आहे.