राखी सावंतच्या Ex पती आदिल खानचं आणखी एक लग्न! फोटो शेअर करत म्हणाला, 'एक नवी सुरुवात...'

Rakhi Sawant's Ex husband Adil Khan Marriage : राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खाननं दुसऱ्यांदा केलं लग्न. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना दिली गूड न्यूज.

दिक्षा पाटील | Updated: Mar 8, 2024, 10:31 AM IST
राखी  सावंतच्या Ex पती आदिल खानचं आणखी एक लग्न! फोटो शेअर करत म्हणाला, 'एक नवी सुरुवात...' title=
(Photo Credit : Social Media)

Rakhi Sawant's Ex husband Adil Khan Marriage : राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान विषयी एक बातमी समोर आली होती की त्यानं बिग बॉस फेम सोमी खानशी लग्न केलं आहे. आदिलनं स्वत: सोशल मीडियावर ही बातमी कन्फर्म केली आहे. त्यानं सोमीसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत आदिलनं खुलासा केला की त्यानं आता नाही तर 3 मार्च रोजी लग्न केलं. त्यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. 

आदिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आदिलनं ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी आणि सोमीनं लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. एका फोटोत ते दोघं लग्नाचे हस्ताक्षर केल्याचा फोटो शेअर करताना दिसले. तर दुसऱ्या फोटोत आदिल सोमीचा चेहरा पाहताना दिसत आहे. असे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. तर सोमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. 

सोमीनं केलं होतं कन्फर्म!

पिंकव्हिलाशी बोलताना सोमीनं तिच्या लग्नाला कन्फर्म केलं होतं. त्यावेळी सोमी म्हणाली होती की हो मी आणि आदिल लग्न बंधनात अडकणार आहोत. आम्ही सध्या बंगळुरुत आहोत आणि आम्ही लग्नाच्या कार्यक्रमांच्या तयारीत व्यस्त आहोत. लग्नानंतर सासरच्यांकडचे काही कार्यक्रम असतील त्यानंतर आम्ही मुंबईत येऊ. योग्यवेळ आल्यानंतर आम्ही लग्नाविषयी सगळी माहिती देऊ. 

राखीची प्रतिक्रिया

जेव्हा पासून राखीला आदिलच्या लग्नाविषयी कळलं होतं. तेव्हा पासून ती सतत इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर करताना दिसली. त्यापैकी एका पोस्टमध्ये तिनं म्हटलं की दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याची खूप हौस होती. पण जेव्हा एकटी होती तेव्हा सगळं सत्य समोर आलं. त्याआधी देखील तिनं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं की तिला स्वत: वर गर्व आहे की कुटुंब, दु:ख, इन्स्क्युरिटी, हार्टब्रेक आणि डिप्रेशन अशा सगळ्यातून जाऊनही ठामपणे उभी आहे. राखी आणि आदिलनं गपचूप लग्न केलं होतं, मात्र काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. 

आदिलची पत्नी सोमी खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान' सारख्या कार्यक्रमांमध्ये दिसली होती. तर सोमी तिची बहीण सबासोबत 'बिग बॉस 12' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. त्या सीजनची विजेता दीपिका कक्कड ठरली होती.