Pushpa च्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बालविवाह, त्यानंतर जे घडलं...

तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही 

Updated: Jan 26, 2022, 08:11 PM IST
 Pushpa च्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बालविवाह, त्यानंतर जे घडलं... title=

मुंबई : पुष्पामधील 'श्रीवल्ली' आणि 'सामी सामी' या गाण्यांव्यतिरिक्त, सिनेमाचे डायलॉग देखील खूप चर्चेत आहेत. तसेच, चित्रपटातील पात्रांबद्दल बोलायचे झाले तर, खलनायकापासून पुष्पाचा मित्र केशवपर्यंत प्रत्येकाचे खरे आयुष्य खूप मनोरंजक आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची भूमिका लोकांना आवडली आहे.

सोबतच पुष्पाच्या आईची चित्रपटातील कहाणी प्रेक्षकांना भावूक करणारी आहे. पण आईची भूमिका साकारणाऱ्या कल्‍पलताचे वय जाणून अनेकजण चकीत झाले आहे.

वास्तविक, या चित्रपटात पुष्पा उर्फ​अल्लू अर्जुनला अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचा रोल देण्यात आला आहे. त्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. अतिशय गरीब कुटुंबातील पुष्पा त्याच्या आईसोबत झोपडीत राहते.

पुढे कथेत, जेव्हा पुष्पा फ्लॅशबॅकमध्ये जातो, तेव्हा त्याच्या वडिलांचे लग्न झालेले असूनही त्याच्या आईशी अनैतिक संबंध होते, असे दाखवण्यात आले आहे. तिचे खरे नाव कल्‍पलता आहे. पुष्पाचे वडील जिवंत असेपर्यंत त्याच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालते, पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीपासून झालेला मुलगा पुष्पाला कुठेही आडनाव वापरू देत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्पलताने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि 10 मालिकांमध्येही दिसली आहे. या चित्रपटात आईची भूमिका साकारून तिने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर अल्लू अर्जुनलाही प्रभावित केले आहे. चित्रपटात अनेक ठिकाणी लोकांना भावूक करणाऱ्या कल्पलताचे वय थोडे आश्चर्यचकित करणारे आहे.

वास्तविक अल्लू अर्जुन आणि कल्पलता यांच्यात फक्त तीन वर्षांचा फरक आहे. अल्लू 39 वर्षांचा आहे, तर कल्पलता 42 वर्षांची आहे. म्हणजे वयात तीन वर्षांचे अंतर असतानाही तिने पडद्यावर आईची भूमिका साकारली. कल्पलता यांना दोन मुली आहेत आणि दोघी नोकरी करत आहेत. कल्पलता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती 14 वर्षांची असताना तिचे लग्न झाले होते.

कल्पलता सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि तिचे फोटो पोस्ट करत असते, जे पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की तिने आईची भूमिका साकारली आहे.