स्वत:च्या फायद्यासाठी राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना निर्मात्याने केलं खोलीत बंद; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अभिनेत्री राणी मुखर्जीला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीचे जवळ-जवळ सगळे सिनेमा हिट आहेत. आज या अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? एका निर्मात्याने स्वतःच्या फायद्यासाठी राणीच्या पालकांना खोलीत बंद केलं होतं. 

Updated: Nov 27, 2023, 04:33 PM IST
स्वत:च्या फायद्यासाठी राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना निर्मात्याने केलं खोलीत बंद; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीचे जवळ-जवळ सगळे सिनेमा हिट आहेत. आज या अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? एका निर्मात्याने स्वतःच्या फायद्यासाठी राणीच्या पालकांना खोलीत बंद केलं होतं. अभिनेत्रीने आपल्या चित्रपटात काम करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी अभिनेत्रीलाही कोणत्याही चित्रपटात काम मिळत नव्हतं. कारण ती तिच्या आधीच्या फ्लॉप सिनेमामुळे नाराज होती.

हा किस्सा दिवंगत निर्माते यश चोपडा यांच्याशी निगडीत आहे. राणी मुखर्जीने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितंल होतं की, तिला साथिया सिनेमाची ऑफर आली होती. मात्र हा सिनेमा तिने रिजेक्ट केला. तिचे पालक राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी हाच संदेश घेऊन यश चोपडा यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. याच दरम्यान त्यांनी तिच्या पालकांना ऑफिसच्या एका रुममध्ये बंद केलं होतं. हा खुलासा स्वत: राणीने केला आहे.

राणीने खुलासा केला आहे की, यश चोप्रा यांनी त्यांना तेव्हाच बाहेर येऊ दिलं. जेव्हा राणीने या सिनेमाची ऑफर स्विकारली. शाद अलीने दिग्दर्शित या हिंदी चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसली होती.'साथिया' हा मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट - 'अलाई पायते'चा रिमेक होता. राणीने पुढे असंही सांगितलं की, यश यांना तिलाच या सिनेमात आईन करायचं होतं पण तिने नकार दिला त्यामुळे तिला त्याने असं केलं आणि म्हणून तिला हा सिनेमा स्विकारावा लागला.
 
'मुझसे दोस्ती करोगे'च्या यशानंतर जवळ-जवळ 8 महिन्यांपर्यंत तिच्याकडे काहीच काम नव्हतं. राणी म्हणाली, ''मी घरी बसले होते. मी कामातून ब्रेक घेतला होता त्यावेळी, मी काम करण्यास नकार देत होते, माझ्या आईला वाटलं की मला वेड लागलं आहे कारण मला ज्या काही ऑफर येत होत्या, मी त्यांना फक्त 'नाही, नाही, नाही' म्हणत होते. तेव्हाच मी निर्णय घ्यायला सुरुवात केली."

पुढे अभिनेत्री म्हणाली "माझं करिअर संपलं आहे असं मला वाटू लागलं. मला वाटलं की कदाचित ते बरोबर असतील पण मी हार मानणार नाही. मी असं काहीतरी करायचं होतं ज्यावर माझं मन माझ्यावर विश्वास ठेवेल. मग सुदैवाने 'साथिया' आला आणि मला आठवतय की यश काकांनी माझ्या आई-वडिलांना ऑफिसमध्ये बोलावलं होतं." 
 
"माझे आई-वडील यश काकांना सांगायला गेले होते की 'राणीला हा चित्रपट करण्यात रस नाही.' त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, 'बेटा, तू खूप मोठी चूक करत आहेस, मी खोलीचा दरवाजा बंद करतो आणि जोपर्यंत तू चित्रपटाला होकार देत नाहीस, तोपर्यंत मी तुझ्या पालकांना बाहेर जाऊ देणार नाही आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. " अशाप्रकारे यश चोप्रा यांनी राणीला हा सिनेमा दिला ज्यामुळे राणी उंचीच्या शिखरावर पोहचली. यानंतर राणीने कधी मागे वळून पाहिलं नाही.