'मी फक्त पैसे कमावण्यासाठी रोमँटिक गाणी लिहिली', जावेद अख्तर यांचा मोठा खुलासा

Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 27, 2023, 04:24 PM IST
'मी फक्त पैसे कमावण्यासाठी रोमँटिक गाणी लिहिली', जावेद अख्तर यांचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Javed Akhtar : लोकप्रिय लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 'शोले' आणि 'जंजीर' सारख्या चित्रपटांची पटकथा लिहिली. जावेद अख्तर यांच्याकडे अनेक वेगवेगळे मजेशीर किस्से असतात. दरम्यान, यावेळी जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी दशकांपूर्वी केलेल्या कामाचं क्रेडिट आता घेऊ शकत नाही याविषयी सांगितलं आहे. कारण वेळेनुसार, व्यक्ती देखील बदलतात. जावेद अख्तर यांनी त्यावेळी त्याच्या रोमॅन्टिक गाण्यांविषयी खुलासा केला आहे. 

'साहित्य आजतक 2023' मध्ये जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी जावेद अख्तर यांनी सांगितलं की सलीम खान यांच्यासोबत मिळून त्यांनी मोठ्या पडद्यावर जी 'एंग्री यंग मॅन' ची भूमिका लिहली होती. त्यावर बर्कले यूनिव्हर्सिटीमध्ये एक मोठा रिसर्च पेपर लिहिला होता. त्यांनी सांगितलं की फ्रान्सचे एक लेखक आहेत, ज्यांनी सलीम-जावेद यांचे मेटाफर, भाषा आणि डायलॉग्सवर खूप काही लिहिलं होतं. जावेद म्हणाले की त्यांनी ही भूमिका आणि पटकथा समाजात काहीही बदल करण्यासाठी नव्हती केली. समाजात यातून काय मेसेज जाईल याचा विचार केला नव्हता. 

त्यांनी सांगितलं की आम्हाला हे काहीच माहित नव्हतं. आम्ही फक्त लिहत होतो की चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल. आता त्याचे काही रेफरन्सेस आहेत याविषयी आम्हाला काही माहित नव्हतं. आम्ही पटकथा याच विचारानं लिहिली की प्रेक्षकांना आवडेल. जेव्हा आम्ही रिसर्च पेपर वाचला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही काही चांगलं काम केलं आहे.  

हेही वाचा : खलनायक होऊन मिळवलं शाहरुखपेक्षा जास्त फेम, पैसे कमावण्यासाठी चित्रपटांची गरज नाही... 'हा' कलाकार कोण ओळखलं का?

पुढे जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या रोमॅन्टिक गाण्यांची एक वेगळीच क्रेझ आहे. त्यासंबंधीत एक मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला. 'मी अनेकदा ही गाणी यासाठी लिहिली, कारण मला पैसे कमवायचे होते. ती एक गरज होती. पुढे त्यांना विचारण्यात आलं की आम्ही असं ऐकलं आहे की अनेक गाणी त्यांनी शबाना यांना पाहू लिहिली आहेत. त्यावर उत्तर देत जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं की 'मी शबानाला पाहून रोमॅन्टिक गाणी नक्कीच लिहिली आहे, पण काही कडवी. पूर्ण गाणी नाही.' पुढे जावेद अख्तर म्हणाले, 'मी गाणी कोणत्याही स्थितीनुसार लिहायचो. मी त्या सिच्युएशनला लक्षात घेत गाणी लिहायचो.'