Nitin Manmohan Health Update : बॉलिवूड निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांना अचानक हृदविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची परिस्थिती नाजूक असून त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवले आहे. 4 डिसेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती अजून गंभीर आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, औषधांमुळे त्यांच्या तब्येती थोडा बदल झाला असून त्यांच्या तब्येत ही गंभीर आहे. नितीन यांची प्रकृती अजूनही चिंतानजक असल्याचे म्हटले जात आहे. नितिन हे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते मनमोहन यांचा मुलगा आहे. नितीन यांना लोक 'बोल राधा बोल', 'लाडला', 'चल मेरे भाई' 'रेडी'आणि 'दस' या चित्रपटांसाठी ओळखतात तर त्यांचे वडील 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' या चित्रपटासाठी ओळखले जातात. नितिन फक्त निर्माते नाही तर उत्तम अभिनेते आहेत.
हेही वाचा : Sonam Kapoor च्या विसरभोळेपणाचं Pro Max उदाहरण पाहून पतीची अशी रिअॅक्शन
नितिन यांना सगळ्यात शेवटी भारत के शहीद या चित्रपटात चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिकेत पाहिले होते. नितिन यांना भेटायला अभिनेता अक्षय खन्ना रुग्णालयात पोहोचला होता. अक्षयनं 'सब कुशल मंगल' सारख्या अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (producer nitin manmohan suffers heart attack currently in icu condition is critical Know Health Update)