Kuljit Pal Passed Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे काल 24 जून रोजी निधन झाले. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुलजीत पाल हे बेड रिडन होते. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुलजीत पाल यांनी बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांना पहिला ब्रेक दिला होता. पण त्यांचा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. कुलजीत यांनी त्यांच्या मुलीलादेखील बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. पण ती चित्रपटसृष्टीत स्वत: जागा करण्यास अपयशी ठरली. तर कुलजीत पाल यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही प्रार्थना सभा 29 जून रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत होणार आहे. या शोकसभेत बॉलिवूडमधील अनेक कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.
कुलजीत यांचे मॅनेजर संजय पाल यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कुलजीत यांनी 'परमात्मा', 'वासना', 'दो शिकारी', 'आशियाना' आणि 'अर्थ', 'आज' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर त्यांची लेक अनु पाल देखील चित्रपटांमध्ये काम करते. तिनं 'आज' या चित्रपटात काम केले होते. तर याच चित्रपटात कुलजीत हे अक्षय कुमारच्या मार्शल आर्ट ट्रेनरच्या भूमिकेत दिसले होते. मात्र, त्यात त्यांचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता.
हेही वाचा : घटस्फोटानंतर पतीसहीत मित्र-मैत्रिणींसोबत Divorce Party; सई ताम्हणकरनंच केलेला खुलासा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री सुलोचना यांचे वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांनी देखील त्यांच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावलं होतं. त्यांनी जवळपास 300 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. तर त्यांच्या आधी साराभाई वर्सेस साराभाई मालिका फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे देखील निधन झाले. वैभवीचा अपघातात निधन झाले होते. तर तिच्यानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेता आदित्य सिंग राजपुतचे निधन झाले. वयाच्या 32 व्या वर्षी आदित्यनं अखेरचा श्वास घेतला होता. तर अजूनही त्याच्या निधनाचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या निधनाच्या आधल्या दिवशी त्यानं घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आदित्यनं त्याच्या कूकला सांगितलं की तो अंघोळ करून येतोय. पण तितक्यात बाथरुममधून जोरात काही पडल्याचा आवाज आला तर तो आदित्य होता. त्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.