नवी दिल्ली : बॉलिवूड ते हॉलिवू़ड असा यशस्वी प्रवास करणारी प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकच्या टी व्ही शो 'क्वांटिको' च्या तिसऱ्या सीजनच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर बॉलिवूडच्या काही स्क्रिप्टचा देखील विचार करत आहे. मात्र या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये ती लग्नाचा देखील विचार करत आहे. मात्र देश-परदेश वारी करणाऱ्या प्रियंकाला अजूनही तिच्या पसंतीचा मुलगा मिळाला नाही.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, खुद्द प्रियंका हा खुलासा केलाय की, ती लग्नासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहे. प्लॅनिंग करून लग्न होत नाही हे ठाऊक असले तरी ती सध्या लग्नाळू झाली आहे.
अचानक झालेल्या विरुष्काच्या लग्नानंतर अनेक स्टार्सच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. मंगळवारी झी सिने अवॉर्ड २०१७ मध्ये सहभागी झालेल्या प्रियंकाला लग्नाबद्दल विचारताच ती म्हणाली, मी लग्नासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहे. जर ती व्यक्ती मला भेटल्यास मी ताबडतोब लग्न करेन.
बॉलिवूड चित्रपटांबद्दल विचारताच प्रियंका म्हणाली, राकेश शर्मांच्या बायोपीकसाठी तिला विचारण्यात आले होते. ज्यात आमिर खान प्रमुख भुमिकेत असणार होता. मात्र त्याने यातून काढता पाय घेतल्याने या चित्रपटात शाहरूख झळकेल. त्यामुळे प्रियंका चोप्रा यापासून लांबच राहणे पसंत करेल.
या सोहळ्यात प्रियंका रणवीर सिंग आणि अनिल कपूरसोबत थिरकताना दिसली.