टायगर श्रॉफच्या गाण्यावर थिरकला शिल्पा शेट्टीचा मुलगा ...

बॉलिवूड अ‍ॅक्टर टायगर श्रॉफ हा त्याच्या भन्नाट नृत्य कौशल्याने आबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध आहे.

Updated: Dec 20, 2017, 10:28 PM IST
टायगर श्रॉफच्या गाण्यावर थिरकला शिल्पा शेट्टीचा मुलगा ...   title=

मुंबई : बॉलिवूड अ‍ॅक्टर टायगर श्रॉफ हा त्याच्या भन्नाट नृत्य कौशल्याने आबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध आहे.

प्रामुख्याने लहान मुलं टायगरचे फॅन्स आहेत. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींच्या गाण्यावर नाचणार्‍या मुलांची त्यांची स्वतःची व्हर्जन पाहणं कमाल आहे. 

राज कुद्रा आणि शिल्पा शेट्टीचा मुलगाही टायगरचा फॅन  आहे. त्यानेही आपलं नृत्य कौशल्य टायगरच्या गाण्यावर दाखवलं आहे. शिल्पाच्या मुलाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

विवानचा खास डांस 

डिंग डॉंग डिंग गाण्यावर विवानने डान्स केला आहे. राज कुंद्राने विवानचा व्हिडिओ  शेअर करताना त्याच्या मित्राच्या वाढदिवसाला  हा डांस केल्याचं म्हटले आहे.  

टायगरचा रिप्लाय 

टायगरचा फॅन असलेल्या विवानला त्याच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. विवान  आत्तापासूनच माझ्यापेक्षा चांगला डांस करत आहे. असे त्याने ट्विटरवर म्हटले आहे. 

 

लवकरच टायगर दिशा पटनीसोबत 'बागी२' मध्ये दिसणार आहे तर त्यानंतर करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २ मध्येही झळकणार  आहे.