२ वर्षे प्रियंका चोप्रा बॉलिवूडपासून दूर....आता केली मोठी घोषणा

आपल्या दर्जेदार अभिनयाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही वेगळी छाप पाडणाऱ्या प्रियंका चोप्रा आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. 

Updated: Mar 27, 2021, 04:09 PM IST
२ वर्षे प्रियंका चोप्रा बॉलिवूडपासून दूर....आता केली मोठी घोषणा  title=

मुंबई : आपल्या दर्जेदार अभिनयाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही वेगळी छाप पाडणाऱ्या प्रियंका चोप्रा आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. 

प्रियंका चोप्राने आपल्या ट्विटरवर आस्क मी एनिथिंग म्हणजेच मला काहीही विचारा या सेशन अंतर्गत आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली. एका फॅनने प्रियंकाला विचारले, की तुझी पुढची बॉलिवूडमधली मूव्ही कधी येणार? त्यावर उत्तर देताना प्रियंकाने म्हटले आहे नेक्स्ट यिअर..म्हणजेच पुढच्या वर्षी.

 

प्रियंका २ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. याआधी तिची फिल्म २०१९ मध्ये आलेली. द स्काय इज पिंक या सिनेमामध्ये प्रियंका झळकलेली. या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम आणि रोहीत सराफ मुख्य भूमिकेत होते. मात्र या चित्रपटानंतर प्रियंका बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही. 

आत २ वर्षे उलटली, तरीही प्रियंका सिनेमात दिसत नसल्याने एका फॅनने तिला अखेर आज विचारलेच, की तुझा पुढचा सिनेमा कधी येणार. त्यावर अखेर आज प्रियंकाने म्हटलंय, की पुढच्या वर्षी तिचा सिनेमा येतोय. अर्थात या सिनेमाचे नाव काय? त्यात आणखी कोण-कोण असणार ही माहिती मात्र प्रियंकाने गुलदस्त्यातच ठेवली आहे.