प्रिया प्रकाशने श्रीदेवी यांना अशी वाहिली श्रद्धांजली!

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण देशाला झटका लागला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 27, 2018, 06:43 PM IST
प्रिया प्रकाशने श्रीदेवी यांना अशी वाहिली श्रद्धांजली! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण देशाला झटका लागला. तमिळ, मल्याळम, तेलगू, हिंदी, कन्नड भाषांमध्ये ५ दशकं काम करणारी लेडी सुपरस्टार श्रीदेवीने २४ फेब्रुवारीला दुबईत अखेरचा श्वास घेतला. 

चांदणी हरपली

लग्नसोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईला रवाना झाली होती. ज्या हॉटेलमध्ये तिचे वास्तव्य होते तिथल्याच रुमच्या बाथरूममध्ये तिचे पती बोनी कपूर यांनी ती मृताव्यस्थेत आढळली. त्यानंतर वाऱ्यासारख्या बातम्या पसरल्या आणि ठिकठिकाणाहून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. तिचे फॅन्स तर अक्षरशः हळहळले. बॉलिवूडकरही दुखावले.

प्रिया प्रकाशने वाहिली श्रद्धांजली

या सगळ्यात रातोरात स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशनेही श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली. प्रिया प्रकाशच्या नावाने सोशल नेटवर्किंग साईटवर अनेक फॅन कॅल्ब सुरू आहेत. त्यापैकी एकाने श्रद्धांजलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 
प्रिया प्रकाशला भुवया उडवताना सगळ्यांनी पाहिले आहे. मात्र या व्हिडिओत ती अत्यंत उदास दिसत आहे. यात प्रिया कभी अलविदा ना कहेना हे गाणे गात आहे.

धडकमधून पर्दापण

श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर करण जोहरच्या धडक सिनेमातूप बॉलिवूडमध्ये  पर्दापण करत आहे. मराठी सुपरहिट सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे.