'धुमधडाका' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, कलाविश्वाला मोठा धक्का

मराठी चित्रपटसृष्टीतून रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे.  

Updated: May 1, 2022, 08:51 AM IST
'धुमधडाका' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, कलाविश्वाला मोठा धक्का  title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी सिनेमा अभिनेत्री प्रेमा किरण यांचे मुंबईत निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 'धुमधडाका', 'इरसाल कारटी', 'पागलपन' , 'अर्जुन देवा', 'कुंकू झाले वैरी' आणि 'लग्नाची वरात लंडनच्या घरात' या सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका बजावली. 

निधनानंतर त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत प्रेमा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. एवढंच नाही, तर 'दे दणादण', 'धुमधडाका' सिनेमातील त्यांच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

80 ते 90 दशकात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. प्रेमा किरण यांनी फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा भाषेतील सिनेमांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता त्यांच्या निधनाने कलाकार आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी तयार झाली आहे.