श्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?

Prabhas Project K : प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटात प्रभासनं श्री राम यांची भूमिका साकारली होती. आता 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास हा विष्णुच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. आधुनिक काळातील विष्णूच्या रुपात प्रभास खनलायकांना हरवताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 3, 2023, 04:13 PM IST
श्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक? title=
(Photo Credit : Social Media)

Prabhas Project K : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा गेल्या अनेक दिवसांपासून 'आदिपुरुष' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतला. इतकंच नाही तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर आता प्रभासच्या चाहत्यांचे लक्ष हे त्याच्या 'सालार' आणि 'प्रोजेक्ट के' नं वेधलं आहे. आता 'प्रोजेक्ट के' मधून एक मोठी बातमी समोर आली आहे की ज्यामुळे प्रभासकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुषमध्ये प्रभू रामाच्या भूमिका साकारल्यानंतर 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास विष्णुच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सगळीकडे इतकं प्रमोशनकरूनही प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट हिट ठरला नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरला. प्रभासचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत असताना 'प्रोजेक्ट के' चर्चेत आला आहे. या चित्रपटाची पटकथा लीक झाल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट मार्वल चित्रपटांप्रमाणे सायन्स फिक्शन, फॅन्टसी, सुपरनॅच्युरल आणि अॅक्शन फिल्स असणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय असल्यासारखी चित्रपटाची पटकथा आहे. या चित्रपटाला वेगवेगळ्या ट्विस्ट देण्यासाठी नाग अश्विननं चित्रपटाला फॅन्टसीशी जोडलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर हिंदू पौराणिक कथांप्रमाणे, भगवान विष्णु हे दूष्टांचा नाश करण्यासाठी एका युगात अवतार घेतात. प्रभास या युगातल्या भगवान विष्णूंचा अवतारात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा अवतार एक मॉर्डन हीरा आहे. जो मॉर्डन काळात मॉर्डन शस्त्रांनी खलनायकांचा सामना करतो. याचा अर्थ हा आधुनिक काळातील विष्णू अवतार आहे. याचाच अर्थ देवाकडे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी तर असणारच, ज्या आजच्या तुलनेतर खूप जास्त एडवांस असतील. तर यावेळी खलनायकाच्या भूमिकेत कोण असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या खलनायकाच्या भूमिकेत कलम हसन दिसणार आहेत. विष्णू देवाच्या अवतारात प्रभास दिसणार असताना. फक्त इतकाच फरक असणार आहे की त्याचा लूक आणि पद्धत ही थोडी आधुनिक जगाप्रमाणे असेल. त्याविषयी सांगतानाचा एक फोटो आणि छोटी क्लिप देखील प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामुळेच चर्चा सुरु झाली आहे की प्रभास हा विष्णूच्या अवतारात दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Gadar 2 मध्ये नाना पाटेकर यांची एन्ट्री! 22 वर्षांपूर्वीच हा चित्रपट 'ब्लॉकबस्टर'

दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर नाग अश्विननं मार्व्हल चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना जर इंप्रेस केलं तर प्रभासचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. प्रभासचे चाहते त्यांच्या अशा चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.