Ponniyin Selvan 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित (PS 2 Box Office Collection) झाला आहे आणि गेल्या तीनच दिवसात म्हणजे 28, 29, 30 एप्रिल रोजी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असून या चित्रपटानं आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट या वर्षात सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरला आहे. त्यातून येत्या काही दिवसातच या चित्रपटाचे पुढील भविष्य ठरणार आहे. जानेवारी महिन्यात शाहरूख खानचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा या चित्रपटानं सगळेच रेकॉर्ड मोडले होते. पठाण चित्रपटानंही दोन दिवसात 100 कोटींच्या वर कमाई केली होती.
त्यामुळे यापुढे येणारे चित्रपट 'पठाण'ला (Pathaan) टक्कर देतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाला आता 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटानं उत्तर दिलं आहे. 'पठाण'नं पहिल्याच दिवशी 57 कोटींचा गल्ला भरला होता तर 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटानं 32 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 'पठाण' या चित्रपटानं दोनच दिवसात 100 कोटींचा गल्ला पार केला होता. तर 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटानं आता तीनच दिवसात 100 कोेटी कमावले आहेत. त्यामुळे आता चित्रपट अजून चांगली कमाई करून शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ला मागे टाकणार का? हे येत्या काही दिवसांतच समजणार आहे.
परंतु सध्या 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटानं पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांना 'ओव्हरटेक' केले आहे. 2021-22 मध्ये हेच चित्र काहीसे दिसले होते. लागोपाठ आलेल्या दाक्षिणात्त्य चित्रपटांनी अक्षरक्ष: बॉलिवूडचे लचके तोडले होते. 'पुष्पा' या चित्रपटानं '83' या चित्रपटाला धक्का दिला होता. त्यापुर्वीही दाक्षिणात्त्य चित्रपट आणि बॉलिवूड असे वॉर सुरू झाले होते. अल्लू अर्जूनसारख्या बड्या कलाकारांनाही यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या होत्या. त्यामुळे आता 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही या चित्रपटाला 150 कोटी कमावायला एक आठवड्याचा कालावधी जावा लागला तोच 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटानं मात्र हा विक्रम 3 दिवसांतच पुर्ण केला आहे.
या चित्रपटानं दोन दिवसात 110 कोटींची कमाई गेल्या दोन दिवसात केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 30 कोटींच्या वर कमाई केली होती.