पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं गाणं Grammy च्या स्पर्धेत! सोशल मीडियावर एकच चर्चा

Grammy Awards 2024 : नरेंद्र मोदी यांच्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला ग्रॅमी नामंकन मिळालं आहे. त्यांच्या या गाण्याला ग्रॅमीचं नामंकन मिळाल्यानं सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 11, 2023, 03:33 PM IST
पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं गाणं Grammy च्या स्पर्धेत! सोशल मीडियावर एकच चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Grammy Awards 2024 : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या क्षेत्रात काही ना काही काम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचं एक गाणं आलं होतं. त्यातं नाव ‘अबंडन्स इन मिलेट्स’ असं आहे. हे गाणं भारतीय-अमेरिकी गायक फाल्गुनी शाह आणि गौरव यांच्यासोबत केलं आहे. या गाण्यात नरेंद्र मोदी देखील फीचर झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी हे गाणं लिहिलं आहे. त्यांच्या या गाण्याला गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाल्यानं सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. 

शुक्रवारी ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 ची लिस्ट जाहिर करण्यात आली. या लिस्टमध्ये पीएम मोदी यांच्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ या गाण्याचा देखील समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाणं फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्यासोबत मिळून लिहिलं आहे. नरेंद्र मोदी हे पहिले राजकारणी आहेत ज्यांनी गाणं लिहिलं आहे आणि इतकंच नाही तर त्या गाण्याला ग्रॅमीचं नामंकन देखील मिळालं आहे. ‘अबंडन्स इन मिलेट्स’ या गाण्यासोबत 'शॅडो फोर्सेस' या गाण्यासाठी अरूज आफताब, विजय अय्यर आणि शहजाद इस्माइली, ‘अलोन’ साठी बर्ना बॉय, डेविडो, ‘फील’साठी डेव्हिडो, ‘मिलाग्रो वाई डिझास्टर’साठी सिल्वाना एस्ट्राडा, बेला फ्लेक, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन फूट शिवाय, ‘पश्तो’ साठी राकेश चौरसिया यांना नामांकन मिळालं आहे.

कशावर आहे ‘अबंडन्स इन मिलेट्स’ हे गाणं? 

‘अबंडन्स इन मिलेट्स’ हे गाणं ज्वारी, बाजरी, रागी, झंगोरी, कंगनी, कुटकी सारखे अनेक धान्य आहेत. तर हे गाणं या सगळ्यांची लागवड आणि धान्य म्हणून त्याची उपयुक्तता यावर आधारित आहे. 2024 हे वर्ष ‘इंटरनॅशनल ईयर ऑफ मिलेट्स’ म्हणून साजरं केलं जाणार आहे. याच निमित्तानं नरेंद्र मोदी यांनी गायिका फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्यासोबत एक गाणं लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांची स्तुती होत आहे. तर हे गाणं प्रदर्शित होण्याआधी फाल्गुनीनं एक पोस्ट शेअर करत सांगितले होते की 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या आणि माझे पती गौरव शाह यांच्यासोबत एक गाणं लिहिलं आहे.'