मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमात रणवीर सिंहने अलाउद्दीन खिलजीची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंह याच्यावर त्या भूमिकेचा इतका पगडा होता की, सिनेमाच्या शूटिंगनंतरही तो अलाउद्दीनला स्वत:तून बाहेर काढू शकत नव्हता. रणवीर ख-या आयुष्यातही अलाउद्दीन सारखा क्रूर, भीतीदायक, रूबाबदार आणि खतरनाक झाला होता. त्यामुळे रणवीर आणि दीपिकामध्ये भांडण झालं. शेवटी रणवीरला यासाठी मनोरूग्ण तज्ञाकडे जाऊन उपचार घ्यावा लागला.
रणवीर सिंह हा अलाउद्दीनच्या कॅरेक्टरमध्ये इतका घुसला होता की त्याचं खाजगी आयुष्य त्याने प्रभावित होऊ लागलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या सेटवर आणि घरी रणवीरचा व्यवहार पूर्णपणे बदलला होता. तो भूमिकेप्रमाणे ख-या आयुष्यातही निगेटीव्ह होत चालला होता. शूटिंग दरम्यान, रणवीर मुंबईपासून दूर दहिसरमध्ये एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. या फ्लॅटमध्ये तो दीपिकासोबत राहत होता.
सिनेमाच्या शूटिंगपर्यंत दीपिका आणि ‘पद्मावती’च्या टीमला रणवीरचं कॅरेक्टरमध्ये राहणं ठिक वाटत होतं. पण शूटिंगनंतरही त्याचं तसं वागणं त्याच्यासाठी धोकादायक ठरलं होतं. दररोज दीपिकासोबत त्याचे भांडण होत होते. दीपिकाला चांगलं लक्षात आलं होतं की, रणवीर कॅरेक्टरमधून सहज बाहेर येऊ शकत नाहीये. त्यामुळे भांडणं होत असतानाही ती त्याच्यासोबत राहत होती.
मीडिया रिपोर्टनुसार, शूटिंग संपल्यावर जेव्हा स्वत:मध्ये बदल दिसला नाही तेव्हा दीपिकाच्या मदतीने तो मानसोपचार तज्ञाकडे गेला. त्यानंतरच तो अलाउद्दीनच्या कॅरेक्टरमधून बाहेर येऊ शकला. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘पद्मावती’दरम्यान मला इमोशनली कॅरेक्टरच्या बाहेर येण्यास वेळ लागत होता. तिच परिस्थीती रणवीरचीही होती. कदाचित शाहिदलाही या समस्येचा सामना करावा लागला असेल.