हा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret

Orry Says I'm Living so I'm Liver : ऑरीची सध्या सोशल मीडियावर जोरात हवा आहे. त्याची इतकी चर्चा रंगलेली असते की काही विचारू नका. सतत परदेशी दौरे, पार्ट्या, हॉलिडेज, महागडे कपडे या तोऱ्यातच तो सतत मिरवत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की का करतो तरी काय? ह्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून, हा सेलिब्रेटी तर नाही मग हा आहे तरी कोण? सध्या एका याचे उत्तर ऑरीनं दिलंय. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 23, 2023, 01:53 PM IST
हा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret title=
orry reveals what he does for earning video viral latest entertainment news in marathi

Orry Says I'm Living so I'm Liver : तुमची संपत्ती किती? तू करतोस काय? तूझी सॅलरी किती? तूझ्याकडे एवढा पैसा कसा? सोशल मीडियावर हायक्लास, लक्झरीयस फोटो टाकायला लागल्यावर नेटकरी कायमच त्यांना हा प्रश्न विचारताना दिसतात. तर अनेक त्यांचे चाहते ही त्यांची बाजू सांभाळतानाही दिसतात. सध्या नेटकऱ्यांच्या टार्गेटवर आहे तो म्हणजे ऑरी म्हणजेच ऑरहान अवत्रमणी. सोशल मीडियाचं जग हे इतकं छोटं झालं आहे की आपल्याला हल्ली कोणी सोशल मीडिया इन्फ्लूएनसर हा पटकन पकडता येतो. त्यात नेटकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे हा ऑरी. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात त्यानं खुलासा केला आहे की तो नक्की काय करतो. इतका पैसा त्याच्याकडे कुठून येतो. त्याच्या या प्रश्नानं सगळेच जण हे अवाक झाले आहेत. काही जण तर त्याचे हे उत्तर ऐकून हैराण झाले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा ऑरी अत्यंत ट्रेडिंग आहे. त्याची चर्चा होताना दिसते ती म्हणजे फक्त आणि फक्त त्याच्या फॅशनमुळे. त्याचे कपडे हे काही साधे नसतात त्यातून त्याच्याकडे इतके लाखो करोडोंचे कपडे असतात की काही विचारू नका. सतत सेलिब्रेटींसोबत पार्टी, हॉलिडेज, कपडे आणि ऐशौराम हे सर्व त्याच्याकडे नक्की येतं कुठून? याचा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यामुळे त्याच्या या नखऱ्याची सॉलिड चर्चा असते. यावेळी त्याच्या एका उत्तरानं तर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की तु नक्की करतोस तरी काय? 

त्यावर त्याच्या उत्तरानं अनेकांची झोप उडवली आहे तर अनेकांनी डोक्याला हातच मारून घेतला आहे. यावेळी तो म्हणाला की, जेव्हा कोणी जॉब (Job) करत तर त्याला आपण जॉबर (Jobber) म्हणतो. जर कोणी पेटिंग (Painting) करत तर त्याला आपण पेंटर (Painter) म्हणतो. तर मी जगतो आहे (I am Living) तर मी लिव्हर आहे. (I am Liver). सध्या त्याच्या या उत्तरानं अनेकांनी डोक्याला हात लावून घेतला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. 

हेही वाचा : Guess Who: शाळेतील या फोटोत एक नाही, तर आहेत पाच बॉलिवूड सेलिब्रेटी; तुम्ही ओळखलंत का?

यावर एका ट्रोलरनं मस्त कमेंट् केली आहे. तो म्हणला आहे की... हे ऐकल्यानंतर तर मी निघतो आहे. मी जातो. मी जाणारा आहे. (After listending this.. I am Leaving... I am a Leaver). सध्या त्याचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतो आहे.