रजनीकांत विमानतळावर आले आणि शांतपणे स्वत:ची बॅग उचलून निघाले; सुपरस्टारचा साधेपणा पाहून भलेभले लाजले

Netizens praise Rajinikanth : रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आला असून त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्या शांत स्वभावाची स्तुती केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 30, 2023, 01:34 PM IST
रजनीकांत विमानतळावर आले आणि शांतपणे स्वत:ची बॅग उचलून निघाले; सुपरस्टारचा साधेपणा पाहून भलेभले लाजले title=
(Photo Credit : Social Media)

Netizens praise Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे नाव 'थलाइवर 170' असे असून जवळपास 33 वर्षांनी ते पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. या सगळ्यात रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी त्यांची स्तुती करत आहे. 

रजनीकांत यांचे चित्रपट 100 कोटी पेक्षा जास्त कमाई करतात. रजनीकांत कितीही मोठे असले तरी देखील ते जमिनीशी नाळ जोडलेले आहेत. अनेकदा ते असं काही करून जातात की सगळ्यांचे लक्ष वेधतात. त्यापैकी एक त्यांची साधरण राहणी आहे. इतकंच नाही तर, दाक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी हे साधारण राहणीमान असल्याचे पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची लक्झरी लाइफ पाहायला मिळाली. अनेकदा हे सेलिब्रिची एकदम साधारण शर्ट आणि ट्राऊझर त्यासोबत चप्पल परिधान करत कार्यक्रमांमध्ये दिसतात. त्या सेलिब्रिटीजपैकी एक म्हणजे रजनीकांत आहेत. त्यांचा देखील आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

रजनीकांत हे स्वत: त्याच्या खांद्यावर बॅग घेऊन विमानतळावर दिसत आहेत. ही बॅग नॉर्मल साइजती आहे. ज्यात लॅपटॉप आणि पुस्तकं वगैरे ठेवता येतात. पण इतके मोठे स्टार असूनही रजनीकांत यांनी स्वत: ही बॅग घेतल्यानं सगळ्यांना आनंद झाला आहे. त्यांनी कमेंट करत रजनीकांत यांची स्तुती केली आहे. कोणी त्यांच्या या कृतीला पाहून खरे सुपरस्टार म्हटले आहे. तर कोणी त्यांच्या या साधेपणाचं फॅन झाल्याचं म्हटलं आहे. 

हेही वाचा : अनैतिक संबंध, 'तिच्या'सोबतचा लिपलॉक; अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, 'मलायका वहिनी मारेल'

दरम्यान, रजनीकांत यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी आनंदी आहेत. रजनीकांत यांनी एक फोटो शेअर करत 33 वर्षांनंतर माझे गुरु अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कीटीजे ज्ञानवेल यांनी केले. या चित्रपटाचं नाव 'थलाइवर 170' आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात मंजू वॉरियर, दुशारा विजयन, रितिका सिंह, राणा दग्गुबाती आणि फहद फासिल देखील दिसणार आहेत.