झक्कास! वरुण धवनपेक्षा निम्म्या वयाचे झाले अनिल कपूर; चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही भुरळ

 66 वर्षीय अनिल कपूर त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त फिटनेससाठीही त्यांना ओळखलं जातं. अनेकवेळा त्यांचा फिटनेस पाहून त्यांच्या वयाच्या आकड्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. नुकतीच अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक शर्टलेस पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Oct 30, 2023, 01:18 PM IST
झक्कास! वरुण धवनपेक्षा निम्म्या वयाचे झाले अनिल कपूर; चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही भुरळ title=

मुंबई : 66 वर्षीय अनिल कपूर त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त फिटनेससाठीही त्यांना ओळखलं जातं. अनेकवेळा त्यांचा फिटनेस पाहून त्यांच्या वयाच्या आकड्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. नुकतीच अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक शर्टलेस पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकाच वेळी दोन भूमिका साकारण्यासाठी शरीराच्या फिटनेसवर किती लक्ष केंद्रित केलं पाहिजे याबद्दल अभिनेत्याने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

दोन चित्रपटांचं शूटिंग
अनिल कपूर यांच्या दोन चित्रपटांचं शूटिंग नुकतंच संपलं आहे. यातील एक चित्रपट 'अ‍ॅनिमल' आणि दुसरा चित्रपट 'फायटर' आहे. अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल'मध्ये 65 वर्षीय बलबीरची भूमिका साकारली आहे. तर 'फायटर'मध्ये त्यांनी 45 वर्षीय एअरफोर्स फायटर रॉकीची भूमिका साकारली आहे.

फिजीकवर खूप काम केलं
अनिल कपूर यांनी पुढे लिहिलं की, 'या दोन्ही पात्रांसाठी शरीराच्या फिजीकवर खूप लक्ष द्यावं लागलं. त्यामुळे मी दोन्ही पात्रांना न्याय देऊ शकेन. आता दोन्ही चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झाले आहे. प्रेक्षक हा चित्रपट कधी बघतील त्या दिवसाची मी वाट पाहत आहे.

कलाकारांच्या प्रतिक्रीया घेतायेत चाहत्यांच लक्ष वेधून
अनिल कपूर यांच्या या पोस्टवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. वरुण धवनने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'तुम्ही १८ वर्षांचं असताना हे करणं सोपं आहे. पण जेव्हा अनिल सर, तुम्ही ३० वर्षांचे झाल्यावर हे थोडं कठीण होऊ शकतं. तर या पोस्टवर सोनम कपूरने स्माईल इमोजी शेअर केला आणि कमेंट करत लिहीलं की, 'बाबा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनिल कपूरचं वर्कफ्रंट
अनिल कपूर शेवटचे 'द नाईट मॅनेजर' वेब सीरिजमध्ये दिसले होते. या वेब सीरिजमध्ये त्याच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत होते. ही वेब सिरीज हिट झाली होती याचबरोबर त्याच्या अभिनयाचं देखील खूप कौतुक झालं. ही वेब सिरीज दोन पार्टमध्ये आली होती.