#ComeOnNetflix : 'हे' १० चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर #ComeOnNetflix मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे.  

Updated: Jul 16, 2020, 10:32 AM IST
#ComeOnNetflix : 'हे' १० चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित title=

मुंबई : ऍमेझॉन प्राइम, हॉटस्टार नंतर आता नेटफ्लिक्स देखील बॉलिवूडचे अनेक बडे चित्रपट आपल्या प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #ComeOnNetflix मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. एवढचं नाही तर अनेक कलाकार #ComeOnNetflix हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडियावर आपला व्हिडिओ पोस्ट करत आहेत. 

रिपोर्ट्सनुसार यंदाच्या वर्षी जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट ऍमेझॉन प्राइम, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत. याबाबत नेटफ्लिक्स आज म्हणजे १६ जुलैरोजी  घोषणा करण्याची  करण्याची शक्यता आहे. 

अभिनेता विक्रांत मैसी आणि अभिनेत्री यामी गौतम स्टारर 'गिन्नी वेड्स सनी'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Date set hai, bas RSVP baaki hai! #ComeOnNetflix let's do this

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेन शर्मा स्टारर 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे'

अनुराग कश्यप, अनिल कपूर यांचा अलाया फर्नीचरवाला स्टारर चित्रपट 'एके vs एके'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#ComeOnNetflix bahut ho gaya drama. You've got to pick an AK today

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर चित्रपट 'रात अकेली है'

जाह्ववी कपूर आणि अंगद बेदी स्टारर चित्रपट 'गुंजन सक्सेना: द करगिल गर्ल'

अभिषेक बच्चन, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, आदित्य रॉय कपूर स्टारर चित्रपट 'लूडो'

अभिनेत्री काजोल स्टारर चित्रपट त्रिभंगा

त्याचप्रमाणे अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर इंदू की जवानी, अभिनेता संजय दत्त स्टारर टोरबाज आणि अभिनेत्री परिणिती चोप्राची मुख्य भूमिका असणारा द गर्ल ऑन द ट्रेन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.