बिग बींसाठी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी केलेलं ते ट्विट डिलीट

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं.

Updated: Jul 12, 2020, 06:34 PM IST
बिग बींसाठी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी केलेलं ते ट्विट डिलीट title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं. यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर आता संपूर्ण जग बच्चन कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. 

'भारताचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो,' असं ट्विट ओली यांनी केलं होतं. पण काही वेळातच त्यांनी हे ट्विट डीलिट केलं. 

अमिताभ सध्या मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांपासून ते बॉलीवूड अभिनेते, नेते मंडळी आणि इतर सेलिब्रिटी अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही ठिकाणी तर अमिताभ बच्चन यांनी लवकर बरं व्हावं, यासाठी पूजाही घालण्यात आली.