अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरकडून प्रार्थना

देश-विदेशातून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Updated: Jul 12, 2020, 04:32 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरकडून प्रार्थना title=

मुंबई : बॉलिवुड अभिनेते आणि महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्याची बातमी येतोच देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना सुरु झाली. सर्वसामान्य व्यक्तीपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी देखील अमिताभ बच्चन यांच्या प्रकृती लवकर चांगली होण्यासाठी प्रार्थना केली. 

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने देखील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. ट्विट करत शोएब अख्तरने अमिताभ बच्चन हे लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यासोबत अभिषेक बच्चन देखील याच रुग्णांलया उपचार घेत आहे. 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर म्हटलं होतं की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी रुग्णालयात उपचार घेत आहे.' अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे.