नेहा कक्कड पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, करताय एकमेकांना डेट

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांच्या जोड्या बनल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना एकमेकांना डेट करतांना येथे पाहिलं गेलं आहे. त्यातच आता बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कड देखील एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.

shailesh musale Updated: Mar 12, 2018, 09:04 PM IST
नेहा कक्कड पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, करताय एकमेकांना डेट title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांच्या जोड्या बनल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना एकमेकांना डेट करतांना येथे पाहिलं गेलं आहे. त्यातच आता बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कड देखील एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.

कोणाच्या प्रेमात नेहा कक्कड?

नेहा कक्कड सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मिले हो तुम हम को या गाण्याने तिचे अनेक चाहते बनले आहेत. पण नेहा ही एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. नेहा ही अभिनेता हिमांश कोहलीच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत. इन्स्टाग्रामवर देखील ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात.

कोठे झाली होती भेट

एका म्यूझिक व्हिडिओच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती. दोघांनी एकत्र व्हॅलेंटाईन देखील साजरा केला. हिमांशूने बॉलिवूडमध्ये यारिया सिनेमातून डेब्यू केला होता. पण आता दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत की नातं फक्त मैत्रीपर्यंत आहे यावर दोघेच स्पष्टीकरण देऊ शकतात.