Nawazuddin Siddiqui Video: 'एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला कसं काय जाऊ शकते', नवाजुद्दीनच्या पत्नीचा संताप

Nawazuddin Siddiqui चा हा Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या पत्नीचा पाठिंबा देत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

Updated: Feb 11, 2023, 08:51 AM IST
Nawazuddin Siddiqui Video: 'एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला कसं काय जाऊ शकते', नवाजुद्दीनच्या पत्नीचा संताप title=

Nawazuddin Siddiqui Video: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची घरच्यांचे आणि पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आपली सून आलियाविरोधात (Aaliya​) पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता अशी बातमी समोर आली आहे की आता आलियाच्या वकिलानं नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबा विरोधात गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आलियानं सोशल मीडियावर केला असून हा पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

आलिया सिद्दीकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवाजुद्दीनसोबत बोलतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती घराच्या आत बोलत आहे तर नवाजुद्दीन गेटबाहेर उभा आहे. आलियानं हा व्हिडिओशेअर करत कॅप्शनही लिहिले आहे. यावेळी आलिया म्हणाली, "ज्या व्यक्तीच्या नजरेत माझी किंमत नाही अशा व्यक्तीला मी आयुष्यातील 18 वर्षे दिल्याचा मला खेद वाटतो. सगळ्यात आधी मी त्याला 2004 मध्ये भेटले आणि आम्ही दोघे एकता नगर, चारकोप, म्हाडा, मुंबई येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचो. आम्ही जिथे रहायचो तिथे त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी एका रुममध्ये राहत होतो... तेव्हा मला विश्वास झाला की तो माझ्यावर प्रेम करतो आणि मला आयुष्यभरासाठी आनंदी ठेवेल. 2010 मध्ये आम्ही लग्न केले आणि 1 वर्षानंतर मी पहिल्या बाळाला जन्म दिला." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलियानं पुढे म्हणाली की, "त्यावेळी माझ्या आईने मला भेट म्हणून दिलेला फ्लॅट डिलिव्हरीसाठी विकला आणि त्याच पैशातून मी नवाजला गाडी सुद्धा भेट केली, जेणेकरून त्याला बसनं प्रवास करण्याची गरज पडणार नाही. आता इतक्या वर्षांनी तो पूर्णपणे बदलला आहे. ही व्यक्ती कधी महान व्यक्ती नव्हती. त्यानं नेहमी त्याची एक्स गर्लफ्रेंड, त्याच्या एक्स वाइफचा अपमान केला आणि आता माझा अपमान करतोय आणि स्वत: च्या मुलांना देखी टार्गेट करतोय. कोणी इतक्या खालच्या पातळीला कसं जाऊ शकतं. सगळी कागदपत्र आणि पुरावे आहेत ज्यात तो मला त्याची पत्नी म्हणाला आहे. फसवणूक करणारा हा कोणत्याही जातीचा असू शकतो आणि ज्यांचे पालनपोषण हे चांगले आहे ते कधीच फसवणूक करणार नाहीत, म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कोणत्याही व्यक्तीच्या धर्माने जाऊ नका."

हेही वाचा : Sidharth Shukla च्या निधनाला 2 वर्षे उलटताच शहनाजला रिलेशनशिपचे डोहाळे! म्हणाली, 'मला बॉयफ्रेंड...'

जुलै 2020 मध्ये आलियाने मुंबईमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात आपला जबाब नोंदवत त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. काही महिन्यांनी आलियाने नवाजुद्दीनसह असणाऱ्या आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर नवाजुद्दीन आपली आणि आपल्या मुलांची कशाप्रकारे काळजी घेत होता याबद्दल तिने सांगितलं होतं.