"अतिआत्मविश्वासामुळे नडला", असं का म्हणताहेत Naseeruddin Shah?

Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचा अतिआत्मविश्वास करिअरमध्ये कसा अडला? नसीरुद्दीन हे ओम पुरी यांच्यासोबत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होते. अतिआत्मविश्वास घेऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आल्यानंतर तिथून बाहेर पडताना त्यांना काय जाणवलं हे सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 2, 2023, 11:41 AM IST
"अतिआत्मविश्वासामुळे नडला", असं का म्हणताहेत Naseeruddin Shah? title=
(Photo Credit : Social Media)

Naseeruddin Shah : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या नसीरुद्दीन हे त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी नसीरुद्दीन शाह यांनी अनेक मुलाखती दिल्या. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन यांनी त्यांच चित्रपटसृष्टीतील करिअर कसं मागे पडलं याविषयी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार ओम पुरी यांना यश मिळालं तर अतिआत्मविश्वासामुळेच त्यांचे करिअर कसं मागे पडलं हे सांगितलं होतं. 

नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या करिअरविषयी बोलताना म्हणाले की “मी 20 वर्षांचा असताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होतो. त्यावेळी मला स्वत:वर अतिआत्मविश्वास होता. मला वाटलं की मी खूप चांगलं काम करत आहे. मला प्रमुख भूमिकांसाठी विचारणा का केली जात नाही, कारण मी ते खूप चांगल्या प्रकारे साकारू शकतो, असं मला वाटायचं. माझा हा स्वभाव चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्या आधीच हळू-हळू गायब झाला. त्याच कारण म्हणजे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये घालवलेले तीन वर्षांविषयी एकदा विचार केला." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे नसीरुद्दीन म्हणाले, "मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अतिआत्मविश्वास घेऊन आलो होतो. मी अलीगड विश्वविद्दालयातून होतो. तिथे मी स्टेजवरचा हीरो होतो. मुलींना मी आणि माझ्या या स्वभावाविषयी सगळं माहित होतं. पण जेव्हा आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडणार होतो, तेव्हा मला एक गोष्ट खूप लागली ती म्हणजे, ओम यांनी तीन वर्षांत खूप काही करुन दाखवलं आणि मी कुठे राहिलो?"

हेही वाचा : Video Viral : 'थांबेल तो संक्या कसला?', चालकाची प्रकृती बिघडताच संकर्षण कऱ्हाडेनं चालवली बस

नसीरुद्दीन  पुढे म्हणाले की "मी जेव्हा इथे आलो होतो, "तेव्हा मी असाच अभिनय करू शकत होतो तर मी आता मी काय शिकून बाहेर पडतोय? मी काय करणार? माझं पोटं मी कसं भरणार? ओम पुरी यांची आठवण करत नसीरुद्दीन म्हणाले ते चिंताग्रस्त, लाजाळू आणि अंतर्मुख स्वभावाचे होते. माझ्यानंतर त्यांना चित्रपटात काम मिळण्यास सुरुवात झाली. या टप्प्यानंतर मला कधीही वाटले नाही की मी आतापर्यंत अगदी सहजतेने कोणत्याही प्रोजेक्ट केलेला नाही, जे ओमला जमले”.

नसीरुद्दीन शाह यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमध्ये ते मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी खूप कमी चित्रपटात काम केले आहे.