'शरीर नव्हे, मडकं...'; ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडताच बॉलिवूड अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

'जर्सी' फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत बॉडी-शेमिंगचा सामना करण्याबद्दल खुलासा केला आहे.

Updated: Apr 28, 2022, 10:52 AM IST
'शरीर नव्हे, मडकं...'; ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडताच बॉलिवूड अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया title=

मुंबईः 'जर्सी' फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत बॉडी-शेमिंगचा सामना करण्याबद्दल खुलासा केला आहे. रंग रूपावरून एखाद्यावर टीका करणं ही गोष्ट काही नवी राहिलेली नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल केलं जातं. असाच अनुभव अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही आला आहे.

कमरेखालील शरीरावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहेत. यूसएमध्ये आपल्याला 'भारतीय कार्दशियन' असं वर्णन करण्यात आलं. मात्र भारतात आल्यावर शरीरावरून ट्रोल करण्यात आल्याचा अनुभव मृणालने शेअर केला.

सोशल मीडियावर जेव्हा मी माझे फोटो शेअर करते, तेव्हा मला कायमच कमरेखालील फॅट्स कमी करण्याचे सल्ले दिले जातात. त्यावेळी मी सांगते की, तो माझ्या शरीराचा बांधा आहे, जर मी ते कमी करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या संपूर्ण शरीरावर परिणाम होईल. चेहऱ्यापासून कमरेपर्यंतच्या शरीरावरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे लोकांच्या टिकेकडे लक्ष न देता मी त्याचा अभिमानच बाळगते.

मृणाल सांगते, मी जेव्हा अमेरिकेत होते, तेव्हा मला समजलं की, माझ्यासारखं कमरेखालचं शरीर मिळवण्यासाठी महिला लाखो रुपये पैसे देण्यासही तयार असतात. जेव्हा मला कोणीतरी भारतीय कार्दिशियन म्हणालं तेव्हा मी ठरवलं की,  ही गोष्ट सुद्धा सेलिब्रेट केली पाहिजे.

त्यामुळे मी सोशल मीडियावर बिनधास्तपणे फोटो टाकते. फक्त या ट्रोलर्सचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याकडे लक्ष देते.