'भारत' चित्रपटातील कतरिनाच्या डायलॉगवर मिम्स व्हायरल

कतरिनाच्या या डायलॉगवर नेटकरी जोरदार खिल्ली उडवताना दिसत आहेत.

Updated: Apr 23, 2019, 11:20 AM IST
'भारत' चित्रपटातील कतरिनाच्या डायलॉगवर मिम्स व्हायरल title=

मुंबई : 'हर मुस्कुराते चेहरे के पीछे दर्द छुपा होता है और वही दर्द आपको जिंदा रखता है।' अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यातील कतरिनाच्या डायलॉगवर चांगलेच मिम्स व्हायरल होत आहेत. 'इसमें इतने भारी ज्ञान की जरूरत नहीं है' कतरिनाच्या या डायलॉगवर नेटकरी जोरदार खिल्ली उडवताना दिसत आहेत. ट्रेलर प्रदर्शित होताच चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून कटरिनाच्या डायलॉगवर नेटकरी वेग-वेगळ्या रितीने प्रतिक्रिया देताना दिसत आहे. या मिम्सच्या माध्यमातून चक्क एका चाहत्यांने पान भाजीची मेजवाणी तयार केली आहे. तर एकाने मोबाईलच्या फिचर्सला या डायलॉगसह जोडले आहे. 

दिशा पटानी आणि कतरिना कैफ यांचीही झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना ही रुपेरी पडद्यावरील चाहत्यांची सर्वाधिक आवडती जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे. जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर हे कलाकारही चित्रपटाच्या ट्रेलरमधून झळकत आहेत. 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत'च्या निमित्ताने सलमान कधीही न दिसलेल्या रुपांमध्ये झळकणार आहे.