बुरखा घालून प्रसिद्ध अभिनेत्रीचं असं काम? अनेकांकडून भयानक धमक्या

बुरखा घालून सर्वांसमोर असं काम करणारी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे तरी कोण? व्हिडीओ व्हायरल   

Updated: Jun 21, 2022, 09:49 AM IST
बुरखा घालून प्रसिद्ध अभिनेत्रीचं असं काम? अनेकांकडून भयानक धमक्या title=

मुंबई : सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ मात्र वादग्रस्त ठरतात. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने बुरखा घातला आहे. पण बुरखा घालून तिने जे काही केलं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तिला धमक्या मिळत आहेत. 

अभिनेत्री स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'हिजाबसह शूटिंग करणे या बीटीएससारख सोपं असत तर...  NO HATES just bunch of people making a film.' असं लिहिलं आहे. 

बुरखा घालून डान्स केल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना कराला लागत आहे. अनेकांनी अभिनेत्रीला हिजाबचा अनादर करणारी व्यक्ती.. असं देखील म्हटलं आहे. तर काहींनी सोशल मीडियावरुन अनफॉलो करण्याची धमकी दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, इस्तंबूल, तुर्कीमध्ये एका दुकानात काळा बुरखा घालून डान्स करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) आहे. मंदना 'लॉकअप' शोमुळे चर्चेत आली होती. 

शोमध्ये मंदानाने तिच्या आयुष्यातील खासगी गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या होत्या. मंदाना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.