'इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं'; 'या' सुंदर तरुणी का म्हणतायेत असं?

'गंगूबाई काठियावाडी' फेम Alia Bhatt ने तरुणींना दाखवला जगण्याचा उत्तम मार्ग  

Updated: Nov 9, 2022, 09:11 AM IST
'इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं'; 'या' सुंदर तरुणी का म्हणतायेत असं?  title=

Gangubai Kathiyawadi Fame Alia Bhatt : 'अरे जब शक्ती, संपत्ती आणि सद्बुद्धी ये तीनों ही औरते हैं, तो मर्दो को किस बात का गुरुर...', 'इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं...' 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiyawadi) सिनेमातील अशा एकापेक्षा एक डायलॉगने अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) महिलांना जगण्यासाठी एक नवी उमेद दिली. काही महिन्यांपूर्वी सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर सिनेमाने प्रचंड कमाई केली, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका महिलेची व्यथा मोठ्या पडद्यावर मांडून आलियाने अनेक महिलांना जगण्याचा उत्तम मार्ग सांगितला. 

आलियाचा ' गंगूबाई' लूक 
आज सिनेमाला प्रदर्शित होवून अनेक महिने झाले असले तरी, साता समुद्रापार देखील सिनेमाची जादू दिसत आहे. मलेशिया मॉडेल्सने गंगूबाईच्या आइकॉनिकमध्ये रॅम्प वॉक केलं. मॉडेल्सने गंगूबाईप्रमाणे मोठ्या लाल रंगाची टिकली, चष्मा... आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला. सध्या मॉडेल्सचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Gangubai look)

'इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं'
नॉर्दर्न हॉट कोचर फॅशन शो 2022 मध्ये (malaysian fashion show) मॉडेल्सने रॉम्प वॉक करताना गंगूबाईच्या लूकला महत्त्व दिलं. एका मॉडेलने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं' असं लिहिलं आहे. मॉडेलच्या पोस्टवरुन आलियाने तरुणींना जगण्याचा उत्तम मार्ग दाखवला  असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा
गंगूबाई यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर इतर महिलांच्या हक्कांसाठी देखील लढा दिला... गंगूबाई यांनी वेश्या व्यवसाय करण्याऱ्या महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या, त्यांच्या मुलांसाठी अनेकांसोबत लढणाऱ्या गंगूबाई.... त्यांची कथा म्हणजे 'गंगूबाई काठियावाडी...' (Gangubai Kathiyawadi)