डेटिंगच्या प्रश्नावर पहिल्यांदा बोलली मलायका अरोरा...

काय म्हणाली मलायका 

डेटिंगच्या प्रश्नावर पहिल्यांदा बोलली मलायका अरोरा...  title=

मुंबई : बॉलिवूडच्या स्टार्समध्ये अफेअरची चर्चा ही अगदी साधी गोष्ट आहे. खूप दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जून कपूरच्या अफेअरची चर्चा आहे. एवढंच नाही तर मलायका - अरबाजच्या घटस्फोटाला अर्जून जबाबदार असल्याचं देखील म्हटलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी दोघं एका फॅशन शोमध्ये दिसले. त्यानंतर अशी चर्चा झाली की, त्यांनी आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे. 

एरव्ही गप्प बसणारी मलायका अरोरा अर्जूनसोबत होणाऱ्या चर्चेवर अखेर बोललीच. मलायका अनीता श्रॉफ अदजानियाच्या टॉक शोवर आली होती. जिथे तिला डेटिंगवर प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना मलायका म्हणाली की,मला तर डेटिंगच्या कॉन्सेप्टबद्दल काही माहितच नाही. मला हे सगळं काही कळत नाही. पुढे ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा ज्या व्यक्तीला डेट केलं त्याच व्यक्तीशी लग्न केलं. याशिवाय मी कुणालाच डेट केलं नाही. यावरून हे स्पष्ट होतं की, मलायका अर्जूनला काय कुणालाच डेट करत नाही. 

मलायका आणि अरबाज 1993 मध्ये 'मिस्टर कॉफी' या जाहिरातीच्या शूट दरम्यान भेटले. नंतर त्यांची ओळख वाढली. अनेक अल्बममध्ये देखील ते एकत्र दिसले. 5 वर्ष डेट केल्यानंतर 1998 मध्ये दोघांनी लग्न केलं. 20 वर्ष लग्नाला झाल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.