'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील कतरिनाच्या लूकवर आमिर फिदा, म्हणतोय...

'ठग्स...'च्या लोकप्रियतेला परफेक्ट हातभार लागत आहे.

Updated: Sep 21, 2018, 04:31 PM IST
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील कतरिनाच्या लूकवर आमिर फिदा, म्हणतोय... title=

मुंबई: अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातील कलाकारांचे अफलातून लूक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सुरुवात झाली आहे. खुद्द आमिर खान सोशल मीडियाच्या माध्यमातून हे लूक सर्वांच्या भेटीला आणत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या साऱ्याला आणि एका अर्थी 'ठग्स...'च्या लोकप्रियतेला 'परफेक्ट' हातभार लागत आहे, असंच म्हणावं लागेल. 

सध्या या परफेक्शनिस्ट आमिरने 'ठग्स...'मधील आणखी एका सौंदर्यवतीचं रुप सर्वांसमोर आणलं आहे. ती सौंदर्यवती म्हणजे कतरिना कैफ. कतरिना या चित्रपटात 'सुरैया जान' ही भूमिका साकारणारल असल्याचं हा मोशन पोस्टर पाहून लक्षात येत आहे. या पोस्टरमधून कतरिनाचं सौंदर्य पाहून अनेकजण तिच्यावर भाळले आहेत, असं ,म्हणणं वावगं ठरणार नाही. 

'सुरैया'च्या रुपातील कतरिनाचा लूक शेअर करत आमिरने त्यासोबत लिहिलं आहे, 'सुरैया जान.... सबसे खूबसूरत ठग ! धूम ३ के वक़्त से मेरा दिल इनपे आया हुआ है... पर कहने की हिम्मत कभी नहीं हुई. कोई अगर इन्हें ये बता दे तो बड़ी मेहेरबानी होगी ;-). ' 

आमिरने दिलेलं हे कॅप्शन पाहता आता त्याची ही इच्छा आणि कतरिनावर असणारं त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणी त्याची मदत करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास येत्या काळात आणखी कोणते ठग्स पाहायला मिळणार याकडेच सिनेरसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.