शॉर्ट्स, क्रॉप टॉप अन्... मलायका अरोराचा हॉट जीम लुक पण चाहत्यांनी केलं इग्नोर?

Malaika Arora: मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिचे जिम लुक हे अनेकदा व्हायरल होत असतात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या नव्या लुकची परंतु यावेळी तिच्या या नव्या जीम लुकला हवा तसा रिसपोन्स मिळालेला नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 19, 2023, 05:59 PM IST
शॉर्ट्स, क्रॉप टॉप अन्... मलायका अरोराचा हॉट जीम लुक पण चाहत्यांनी केलं इग्नोर? title=
malaika arora new gym look fans ignores besides prasing her

Malaika Arora: मलायका अरोरा हिची जोरात चर्चा रंगलेली असते. खासकरून तिच्या प्रत्येक जीम लुकची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली असते. सध्या तिचा नवा लुकही आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु यावेळी इतक्या हॉट अभिनेत्रीचा नवा व्हायरल होऊनही मात्र तिच्याकडे चाहत्यांनी इग्नोर केलं आहे. तिच्या नव्या लुकचे फोटो हे सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं येल्लो कलरचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट परिधान केली होती. सोबतच त्यावर तिनं हुडी घातली होती. हातात बॉटल आणि पायात जीमचे शूज व सनग्लासेस होते. परंतु तिच्या लुककडे पाहून चाहत्यांनी तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही असे दिसते आहे. त्यामुळे तिची फारशी चर्चाही रंगलेली नव्हती. मध्यंतरी तिच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. सध्या तिच्या या नव्या लुकचा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. 

मलायकाच्या लुकची जोरात चर्चा होताना दिसते. तिच्या हरएक जीम लुकचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून यावेळही तिचा हा नवा लुक व्हायरल झाला होता. तिच्या चालण्याच्या स्टाईलवरून तिला बऱ्याचदा ट्रोल केले जाते. तिच्या या फॅशनचे अनेक मीम्स आणि रोस्ट करणारे व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. आता तिच्या या लुकमुळे चाहत्यांना घाम फुटण्याची अपेक्षा होती परंतु तसं काही फारसं झालेलं दिसलं नाही. अनेकदा तिला सोशल मीडियावरून तिच्या नव्या लुकसाठी ट्रोलही केलं जाते. परंतु असेही यावेळी होताना दिसलं नाही. मलायकाचं इन्टाग्राम अकांऊटही ती कायमच अपडेट करताना दिसते. सोबतच तिचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसतात. सध्या तिच्या इन्टाग्रामवरील फोटोंचीही जोरात चर्चा आहे. 

हेही वाचा : VIDEO: ज्येष्ठ अभिनेत्रीचा मान राखा; पापाराझींचे गैरवर्तन पाहून भडकला रणबीर, म्हणाला...

गेल्या अनेक दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या जोरात चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहत्यांना बरेच टेंशनही आले होते. परंतु सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या काहीच चर्चा नाहीत. यादरम्यान अर्जुननं मलायकाच्या एका पोस्टवर कमेंटही केली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता मलायका ही चित्रपटसृष्टीत तशी फारशी सक्रीय नाही. त्यातून ती आता झलक दिख ला जामधून परिक्षण करताना दिसते आहे. सध्या याचा एक नवा प्रोमो समोर आलेला आहे.