VIDEO: ज्येष्ठ अभिनेत्रीचा मान राखा; पापाराझींचे गैरवर्तन पाहून भडकला रणबीर, म्हणाला...

Ranbir Kapoor Waheeda Rehman: रणबीर कपूर हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. यावेळी तो आलिया भट्ट हिच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होता. वहिदा रेहमान यांच्यासोबत पापाराझींचे गैरवर्तन पाहून रणबीर कपूर प्रचंड चिडला. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 19, 2023, 05:12 PM IST
VIDEO: ज्येष्ठ अभिनेत्रीचा मान राखा; पापाराझींचे गैरवर्तन पाहून भडकला रणबीर, म्हणाला... title=
ranbir kapoor shows anger on paparazzi as the make chaos where wahida rehman was sitting at the national awards ceremony

Ranbir Kapoor Waheeda Rehman: परवा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त सेलिब्रेटी उपस्थित होते. दिल्ली येथे पार पडलेल्या या सोहळ्यातील एक व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी या पुरस्कार सोहळ्याला अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार आलेले होते. वहिदा रेहमानही यावेळी येथे उपस्थित होत्या. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. यावेळी पुरस्कार स्विकारताना त्यांना अश्रुही अनावर झाले होते. पुढच्या सीटवर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या बसलेल्या होत्या. त्यांच्यापुढे उभ्या असलेल्या छायाचित्रकारांनी बराच गदारोळ माजवला. पहिल्या सीटवर बसलेल्या वहिदा रेहमान यांना घाईगडबड करू लागलेल्या फोटोग्राफर्सकडून बराच त्रास होऊ लागला आणि त्या फारच घाबरल्या. त्या जिथे बसल्या होत्या ते टेबलही जोरजोरात हलू लागले होते. 

अशाप्रकारे छायाचित्रकारांचे गैरवर्तन पाहून वहिदा रेहमान यांच्या मागे बसलेला रणबीर कपूर फारच भडकला. हे पाहताच तो आपल्या सीटवरून त्वरित उठला आणि छायाचित्रकारांना ओरडू लागला. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळी रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्याचे हे वर्तन पाहून नेटकरी त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. तर अनेकांनी असं म्हटलं आहे की रणबीर हा थेट आपल्या वडिलांवरच गेला आहे. ऋषी कपूरही अनेकदा मीडियावर आणि पापराझींवर भडकायचे. रणबीर कपूरचं वर्तन पाहून त्याला ज्येष्ठ अभिनेत्रींचा किती आदर हे लक्षात येते, असंही अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी त्याच्या बाजूला बसलेली आलियाही या प्रकारानं चिडलेली दिसते. तिला पहिल्यांदा कळत नाही की काय होतं तेव्हा रणबीर तिला समजावून सांगतो. 

हेही वाचा : नाव न घेता कोणावर इशारा? महेश भट्ट म्हणाले, 'लोक म्हातारे होतात पण 'मोठे' नाही'

यावेळी राष्ट्रीय पुरस्कारांची चर्चा होती. आलिया भट्ट, क्रिती सनन, अल्लू अर्जुन, करण जोहर, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. यावेळी सगळ्यांचीच जोरात चर्चा होती. विवेक अग्निहोत्रींचीही यावेळी चर्चा होती. करण जोहरला पाहताच त्यांनी डोळे फिरवले होते आणि सोबतच त्यांनी करण जोहरचा फोटोही क्रॉप केला होता. त्यावरून बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर कपूरचा एनिमल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यातून अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तडकी स्टारकास्टही दिसणार आहे.