Maharashtrachi Hasyajatra 'अवली लवली कोहली' गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा

Maharashtrachi Hasyajatra छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. या शोनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. शोमधील कोहली कुटुंबाचं गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 29, 2022, 03:22 PM IST
Maharashtrachi Hasyajatra 'अवली लवली कोहली' गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा  title=

Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra). या शोमध्ये असलेले सगळेच कलाकार हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या स्किटमध्ये असलेले एक-एक विनोद हे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. नुकताच शोमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ शोमधल्या काही डायलॉग्सचं गाण्यात रुपांतर करण्यात आल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होणार नाही. 

हास्यजत्रेतील कोहली कुटुंब हे प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेलं आहे. (Maharashtrachi Hasyajatra kohli family) कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव हे हटके आहे. कुटुंबातील सदस्यांची भन्नाट नावं ऐकली तरी कोणाला हसू अनावर होत नाही. कुटुंबातील सदस्य हे त्यांची नाव सांगत असतात त्यांचे डायलॉग सुरु असताना बॅग्राऊंडवला म्युझिक देत एका तरुणानं अजब गाणं तयार केलं आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या नावात ली हे अक्षर आहेच. कोणत्याही गोष्टीविषयी बोलताना ते ली हा शब्द वापरतात. यामुळे सगळा गोंधळ होतो. 

पाहा व्हिडीओ -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं असून ऐकल्यानंतर हसून हसून तुम्हीही वेडे व्हाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये समीर चौगुले (Samir Choughule), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), शिवाली परब (Shivali Parab), नम्रता संभेराव (Namrata Sambherav) व प्रियदर्शनी (Priyadarshani) या कलाकारांची मुख्य भूमिका आहे. ( Maharashtrachi Hasyajatra avali lovely kohli funny song viral on social media) 

हेही वाचा : लग्नातील Western Outfit वर संतापल्या Asha Parekh म्हणाल्या, 'लठ्ठ असो किंवा काहीही, महिला या...'

दरम्यान, हे ट्रेंड सगळ्यात आधी यशराज मुखातेनं (Yashraj Mukhate) सुरु केला होता. यशराज डायलॉग्सवरून गाणी बनवू लागला आणि मग हा ट्रेंड सुरु झाला आहे. यशराजने या आधी तयार केलेलं पावरी साँग चांगलंच ट्रेंड झालं. तसचं बिग बॉस फेम शेहनाज गीलच्या (shehnaaz gill) एका संवादावर त्यानं तयार केललेलं 'तुम्हारी फिलिंग तुम्हारी' हे गाणही सोशल मीडियावर गाजलं.