Actress Asha Parekh On Western Outfit : बॉलिवूड अभिनेत्री आशा पारेख ( Asha Parekh ) यांनी 60-70 चं दशक चांगलंच गाजवल आहे. आशा पारेख यांनी नुकतीच गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सहभागी झाल्या होत्या. यावेळी आशा पारेख यांनी त्यांच्या काळात त्यांनी कशा प्रकारे चित्रपटाचे चित्रीकरण केलं आणि त्यांना कोणत्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले याविषयी सांगितले. याशिवाय आशा पारेख यांनी लग्नसोहळ्यांमध्ये महिला पाश्चिमात्य कपडे परिधान करतात अशा महिलांच्या नव्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यासोबतच वेस्टर्न कपडे परिधान करणाऱ्या जाड मुलींबद्दल त्यांचं मत मांडलं आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लग्नसोहळ्यात पाश्चात्य कपडे परिधान परिधान करण्याबाबत आशा पारेख स्पष्ट बोलल्या आहेत. सगळ्या गोष्टी आता बदलल्या आहेत. महिला आता पाश्चिमात्य ड्रेस परिधान करत लग्नाला जातात. घागरा चोळी, साड्या आणि ड्रेस आपल्या संस्कृतीत आहेत, ते परिधान करा ना. पुढे आशा पारेख म्हणाल्या, 'आपण असे कपडे परिधान का करत नाही? ज्या प्रकारचे चित्रपट बनवण्यात येत आहे. चित्रपटात अभिनेत्री जसे कपडे परिधान करत तसे कपडे परिधान करतात, मग ते लठ्ठ असो किंवा काहीही असो. (asha parekh talked about western culture for wedding fat women and not working with dilip kumar)
आशा पुढे म्हणाल्या, 'हे सगळं वेस्टनायजेशन पाहून मला वाईट वाटतय. आपल्याकडे इतकी उत्तम संस्कृती, डान्स आणि संगीत आहे की आपण ते पॉप संस्कृतीत परत आणू शकतो.आशा फक्त वेस्टर्न कल्चर नाही तर त्यासोबतच दिलीप कुमार हे त्यांना का आवडत नव्हते याविषयीही बोलल्या आहेत. 'चार पाच वर्षांपूर्वी मीडियातील काही लोकांनी लिहिलं की मी दिलीप कुमार यांच्यासोबत काम करत नाही कारण मला ते आवडत नाहीत. मला ते खूप आवडायचे आणि मला त्याच्यासोबत काम देखील करायचं होतं. 'जबरदस्त' या चित्रपटासाठी मला आणि दिलीप कुमार आम्हाला दोघांना साइन करण्यात आलं होतं. आम्ही त्या चित्रपटात एकत्र काम करणार होतो, पण काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही आणि चित्रपट रखडला.' (Asha Parekh Talked About Not Working With Dilip Kumar)
दरम्यान, आशा पारेख यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'आसमान', 'धोबी डॉक्टर', 'श्री चैतन्य महाप्रभू', 'बाप बेटी' या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर 1959 मध्ये त्यांनी 'दिल देके देखो' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांचा सगळ्यात शेवटचा चित्रपट हा 'सर आंखों' हा होता.