Ananth Mahadevan on Laapataa Ladies : आमिर खान प्रॉडक्शन आणि किरण राव यांचा लापता लेडीज या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहिला मिळतं आहे. सर्वत्र या चित्रपटाची कथा, डॉयलॉग आणि कलाकारांच्या अभिनयाच कौतुक होतंय. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला लापता लेडीजने रणबीर कपूर याचा अॅनिमल या चित्रपटाला मागे टाकलंय. या चित्रपटातील गाण्यांवर इन्स्टाग्रावर खूप रिल्स पाहिला मिळत आहे. या सर्वत्र कौतुकाच्या वर्षावात चित्रपट कॉपी पेस्ट असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलाय.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी किरण रावचा लापता लेडीज हा कॉपी पेस्ट असल्याचा दावा केलाय. 1999 मध्ये 'घुंगट के पट खोल' या चित्रपटातून तो कॉपी केल्याचा दावा महादेवन यांनी केल्याय. या आरोपानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली असून अनेक नेटकरांनी महादेवन यांना समर्थन दिलंय.
अनंत महादेवन म्हणाले की, या दोन्ही चित्रपटातील कथा ही नववधूंच्या अवतीभोवती फिरते. मी लापता लेडीज पाहिला आणि या चित्रपटाची सुरुवात, त्यातील घटना या सारख्या आहेत. माझ्या चित्रपटात शहरातील एक मुलगा लग्नासाठी त्याच्या गावी जातो. घुंगटात असलेल्या आपल्या नववधूला रेल्वे स्थानकावर बेंचवर बसायला आणि तिथे परत आल्यावर तो चुकीच्या वधूला घेऊन जातो. नंतर कथा दोन स्त्रियांभोवती फिरते.' त्याशिवाय पोलीस घुंगट घातलेल्या फोटो पाहतो आणि त्याला काही समजत नाही. हा सीन माझ्या चित्रपटातील असून पोलिसाऐवजी एक सामान्य व्यक्ती ते करतो.
विशेष म्हणजे लेखिका निवेदिता शुक्ला यांनी एक ट्विट केलंय. ज्यात त्यांनी लापता लेडीजचं कौतुक केलंय पण दुसरीकडे हा अनंत महादेवन यांच्या घुंगट के पट खोल या चित्रपटाची कॉपी असल्याच म्हटलंय. हा चित्रपट पहिल्यांदा 1999 मध्ये दूरदर्शन गोल्डवर डायरेक्टर्स कट सहित झळकला होता. त्या असंही म्हणाल्यात की, आश्चर्याची गोष्ट म्हणजे घुंगट के पट खोल हा चित्रपट लापता लेडीज रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवरुन काढण्यात आला.
In the past I had appreciated Laapataa Ladies, and it is now being celebrated for surpassing views of Animal on Netflix.
But little did I know, that it has been copied from @ananthmahadevan's "Ghoonghat ke pat khol".
Which was first aired in 1999 on Doordarshan Gold under their… pic.twitter.com/QqzxAMciDd— Nivedita Shukla (Modi ji ka Pariwar) (@OfRunjh) May 24, 2024
अनंत महादेवन यांच्या आरोपानंतर लापता लेडीजचे लेखक बिप्लब गोस्वामी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाली की, ही त्यांची मूळ कथा असून याची स्क्रिप्ट त्यांनी 2018 मध्ये सिनेस्तान इंडियाच्या स्टोरीटेलर्स कॉन्टेस्टमध्ये सादर केली होती. तेव्हा मला प्रथम उपविजेतेपदाचा पारितोषित मिळालं होतं. माझी कथा, पटकथा, संवाद, व्यक्तिरेखा आणि दृश्ये सर्व 100 टक्के मूळ असून मी कोणत्याही कथा, चित्रपट किंवा कादंबरीतून प्रेरित झालो नाही.
तसंच मी अनंत महादेवन यांचा चित्रपट पाहिला नाही. तर एका मुलाखतीत मला विचारण्यात आला की, माझा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कादंबरी, नौकाडुबीपासून प्रेरित आहे का? तसंच एका 60 वर्षीय निर्मात्याने मला चित्रपटाच्या रिलीजच्या खूप आधी फोन केला होता की, त्याच्या आईसोबत ती वधू असताना असाच एक प्रसंग घडला होता.