मुनव्वर फारुकीने गुपचुप केलं दुसरं लग्न? व्हायरल Photo मुळे चाहते हैराण

Munawar Faruqui Second Marriage: 'बिग बॉस 17' चा विजेता आणि स्टॅंड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीसंबंधीत एक हैराण करणारा दावा केला जात आहे. काही रिपोर्टच्यामते मुनव्वर गुपचुप दुसरं लग्न केलं आहे. याचा एक फोटो व्हायरल झाला असून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

राजीव कासले | Updated: May 28, 2024, 11:20 AM IST
मुनव्वर फारुकीने गुपचुप केलं दुसरं लग्न? व्हायरल Photo मुळे चाहते हैराण title=

Munawar Faruqui Second Marriage Rumours: रियालिटी शो 'लॉक-अप'-'बिग बॉस 17' च्या विजेता आणि स्टॅंड-अफ कॉमेडिअन मुनव्वर फारुखी (Munawar Faruqui) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुनव्वरने दुसरं लग्न केल्याचं बोललं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार मुनव्वरने गुपचुप दुसरं लग्न (Munawar Faruqui Second Marriage) केलं. यादरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल (Viral Photo) झाला आहे, ज्यामुळे मुनव्वरच्या दुसऱ्या लग्नाचा दावा आणखी ठोस झाला आहे. याबाबत मुन्नवर किंवा त्यांच्या जवळच्या कोणीही या फोटोवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा तो फोटो शेअर केलेला नाही. 

पण व्हायरल फोटोमुळे मुनव्वरचे चाहते हैराण झाले आहेत. बिग बॉस 17 विजेता मुनव्वर याचं पहिलं लग्न झालं आहे. पण जास्त काळ टिकलं नाही. पहिल्या बायकोपासून मुनव्वरला एक मुलगाही आहे. तो मुलगा वडिलांबरोबर म्हणजे मुनव्वरबरोबर राहातो. त्यामुळे मुनव्वरच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला असून यात 'निकाह ऑफ M and M' असं लिहिण्यात आलं आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर कोणाचंही पूर्ण नाव लिहिण्यात आलेलं नाही. नावाचं पहिलं अक्षर छापण्यात आलं आहे. 

तो फोटो मुनव्वरच्या लग्नाचा?
रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार 26 मे रोजी मुनव्वरचा निकाह झाला. यात कुटुंबातील काही जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मुनव्वर फारुखीच्या फॅन अकाऊंटवर हे खोटं वृत्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर मुनव्वरच्या काही जवळच्या लोकांनी मुनव्वरच्या निकाहाची बातमी खरी असल्याचं म्हटलंय. निकाहाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातला एम म्हणजे मुनव्वरचा असल्याचा दावा केला जात आहे. 

मुनव्वरचं दुसरं लग्न?
इतकंच नाही तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मुनव्वरच्या दुसऱ्या पत्नीचं नाव महजबीन कोटवाला असं आहे. महजबीन एक मेकअप आर्टिस्ट आहे. त्याआधी मुनव्वरचं पहिलं लग्न झालं आहे. बिग बॉस 17 कार्यक्रमात स्वत: मुनव्वरने याचा खुलासा केला होता. कुटुंबियांच्या सांगण्यावरुन मुनव्वरने हे लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. पहिली पत्नी का सोडून गेली याबाबत विचारल्यावर मुनव्वरने उत्तर देणं टाळलं होतं.