आत्महत्या करण्याची केआरकेची ट्विटरला धमकी

कमाल आर. खान याचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड झाले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 27, 2017, 04:33 PM IST
आत्महत्या करण्याची केआरकेची ट्विटरला धमकी title=

मुंबई : वादग्रस्त ट्विट्स आणि अजब फिल्म रिव्ह्यूसाठी ओळखल्या जाणाऱ्या कमाल आर. खान याचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड झाले आहे.

वादग्रस्त ट्विट्स आणि कमेंट्समूळे ट्वीटर इंडियाने याआधीही त्याला ट्विटरच्या बाहेर केले होते. 

'खान्स' वर टीका

त्यानंतर कमाल पुन्हा ट्विटरवर आला आणि शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांना टार्गेट करु लागला होता.

पुन्हा सस्पेंड

ट्विटरवर तो @KRKActor नावाच्या हॅडलवर आहे. पण त्याचे अकाऊंट पुन्हा सस्पेंड करण्यात आले आहे. याबाबत ट्टिटर इंडियाकडून कोणती माहिती मिळाली नाही. पण गेल्या काही दिवसात आलेल्या ट्विट्समूळेच त्याचे अकाऊंड सस्पेंड केल्याचा अंदाज आहे. 

ट्विटरलाच धमकी 

ट्विटरने उचललेल्या पावलानंतर कमालने ट्विटर कंपनीलाच धमकी दिली आहे. ट्विटर रिस्टोर करा नाहीतर आत्महत्या करेन असे त्याने म्हटले आहे. 

'मला अडवण्यापेक्षा चांगले सिनेमा करा'

 कमालने का ट्विटमध्ये लिहिले की, " शाहरूख+सलमान+आमिर खान यांनी माझे अकाऊंट बंद करण्याचा ट्विटरला फोर्स केला.
 पण ते मला त्यांचा सिनेमाचा रिव्ह्यू करण्यापासून रोखू शकत नाहीत. फिल्म रिव्ह्यू करुन यांचे बकवास सिनेमे बघण्यापासून मी लोकांना वाचवू इच्छितो. मला अडविण्यापेक्षा त्यांनी चांगले सिनेमा करायला हवेत.''