कमल हसन यांनी चाहत्याला दिला धक्का, व्हिडिओ व्हायरल

सिने अभिनेता कमल हसन यांची वादातून काही सूटका होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. अलीकडे एक व्हिडिओमुळे कमल हसन पुन्हा अडचणीत आले आहेत.

Updated: Nov 27, 2017, 04:30 PM IST
कमल हसन यांनी चाहत्याला दिला धक्का, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : सिने अभिनेता कमल हसन यांची वादातून काही सूटका होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. अलीकडे एक व्हिडिओमुळे कमल हसन पुन्हा अडचणीत आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला कमल हसन धक्का मारतांना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. रजनीकांत तिथे असते तर त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत असे कधीही केले नसते असं काही लोकांचं म्हणणं आहे.

कमल हसन एका दुकानातून बाहेर येत आहे. काही लोकं कमल हसन यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी गर्दी करुन आहेत. कमल हसन बाहेर येताच लोकं ओरडू लागतात. एक फॅन तर त्यांच्याकडे पोहोचते पण कमल हसना त्याला धक्का मारुन पुढे निघून जातात.

पाहा व्हिडिओ

कमल हसन यांची ही गोष्ट लोकांना पसंत नाही आली. लोकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त करणं सुरु केलं आहे. कमल हसन यांचे काही चाहते त्यांचा बचाव करण्यासाठी देखील उतरले आहेत.