महाल आणि बंगल्यांसह सैफ अली खान इतक्या कोटी रूपयांचा मालक

सैफ अली खना त्याच्या संपत्तीमुळे तुफान चर्चेत ....  

Updated: Jul 10, 2021, 01:42 PM IST
महाल आणि बंगल्यांसह सैफ अली खान इतक्या कोटी रूपयांचा मालक   title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खान  (Saif Ali Khan) सध्या त्यांच्या आगामी 'भूत पोलीस' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. सैफ आगामी चित्रपटामुळे तर चर्चेत आहेचं. पण सैफ आणि अभिनेत्री करिना कपूरने त्यांच्या छोट्या मुलाचं नाव 'जेह' ठेवल्यामुळे देखील खान कुटुंब चर्चेत आहे. सांगायचं झालं तर सैफ पतौडी कुटुंबातील असल्यामुळे इतर सेलिब्रिटींच्या संपत्तीपेक्षा सैफची संपत्ती देखील फार मोठी आहे. जाणून सैफची संपत्ती नक्की किती आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सैफच्या संपत्तीबद्दल  सांगायचं झालं तर, हरियाणा स्थित पटौदी पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी रूपये आहेत. रिपोर्टनुसार मुंबईत देखील त्याचे अनेक फ्लॅट आहेत. ज्यांची किंमत 4.2 कोटी रूपये आहे. शिवाय अन्य दोन बंगल्यांची किंमत 6 कोटी रूपये आहेत. तसेच परदेशातही सैफचा हॉलिडे होम आहे. रिपोर्टनुसार सैफ अली खान सुमारे 1 हजार 120 कोटीं रूपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

फोर्ब्स 2019 च्या यादीनुसार, सैफ अली खानने 2018-19 मध्ये 17.03 कोटी रुपये कमावले. एकूण निव्वळ किमतीचा अंदाज लावला तर सैफ अली खानच्या राजवाड्याच्या किमतीव्यतिरिक्त 282 कोटी तो रुपयांचा मालक आहे. शिवाय सैफला महागड्या गाड्यांचा देखील शोक आहे. सैफकडे  ऑडी, बीएमडब्ल्यू 7, रेंज रोव्हर, मसटँगसोबत अन्य गाड्या देखील आहेत.  त्याच्याकडे असलेल्या गाड्यांची किंमत 50 लाख रूपयांपासून 2 कोटीपर्यंत आहे.