हृतिक-आलियाचा लहानपणीचा फोटो व्हायरल

हृतिक-आलियाचा हा फोटो पाहिलात का?

Updated: Jun 12, 2019, 08:41 PM IST
हृतिक-आलियाचा लहानपणीचा फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता हृतिक रोशनचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता आणि आलिया भट्ट, आलियाची बहिण शाहीन भट्टदेखील दिसत आहे. स्टार किड्सच्या या फोटोमध्ये हृतिक रोशनही पोज देताना दिसत आहे. 

चित्रपट निर्माते अनु रंजन यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनु रंजन यांची मुलगी अनुष्का रंजन आणि अकांक्षा रंजन कपूर देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी फोटोला छान कॅप्शनही दिलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक प्रेक्षकांकडून या फोटोला पंसती मिळत आहे. या फोटोमधील हृतिकलाही अनेकांनी पसंती दर्शवली आहे. 

 
 
 
 

A post shared by Anu Ranjan (@anuranjan1010) on

आलिया भट्ट सध्या वाराणसीमध्ये तिच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून आलिया आणि रणबीर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे हृतिक रोशनचा आगामी 'सुपर ३०' चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. येत्या १२ जुलै रोजी हृतिकचा 'सुपर ३०' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.