नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!

Ketki Mategaonkar and Allu Arjun : केतकी माटेगावकरसोबत अल्लू अर्जुन! 'पुष्पा'चा मराठमोळा अंदाज एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Sep 30, 2023, 06:12 PM IST
नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!  title=
(Photo Credit : Social Media)

Ketki Mategaonkar and Allu Arjun : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकरनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. केतकीचे लाखो चाहते आहेत. 'टाईमपास' या चित्रपटातून केतकीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला प्राजू म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर केतकीनं मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण तिची जाहिरात आहे. केतकीला दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती जाहिरात शेअर करत केतकीनं तिच्या भावना मांडल्या आहेत. 

केतकी आणि अल्लू अर्जुनसोबत!

केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीत अल्लू अर्जुनसोबत केतकी दिसतेय. इतक्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळणं हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं तिने म्हटलं आहे. ही संपूर्ण जाहिरात शेअर करत केतकीनं कॅप्शन दिलं की 'अल्लू अर्जुनच्या पहिल्या महाराष्ट्रासाठी बनवण्यात आलेल्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. हा दुर्मिळ योग जुळवून आणल्याबद्दल आभार.' तर ही जाहिरात रेड बसची आहे. 

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅन्टीक अंदाज

केतकीची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'केतकी खूप चांगलं... आणि तो डायलॉग हा सामान नाही सम्मान आहे... अप्रतिम.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अप्रतिम... केतकी तुझ्यावर अभिमान आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पुष्पा भाऊ... केतकी अभिमान आहे तुझा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'एक नंबर, नाद खुळा, कडक  केतकी ताई, अल्लू अर्जुनसोबत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप छान... तुझी अशीच प्रगती होत राहो.' तर काही नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'नाशिकमध्ये शूट केलं आहे का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मराठीत केली असती तर खूप छान झाल असतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'महाराष्ट्रीयन कल्चर हिंदी मध्ये..ते पण एक तमिळ हिरो घेऊन... सुधरा रे...'