बॉलिवूडमध्ये गोड बातम्यांचा सपाटा; तारखेसह शेअर केली गुडन्यूज

कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. 

Updated: Jun 28, 2022, 04:28 PM IST
बॉलिवूडमध्ये गोड बातम्यांचा सपाटा; तारखेसह शेअर केली गुडन्यूज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आणि तिला पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. वास्तविक, अभिनेत्रीने लग्नानंतरचा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट आहे 'फोन भूत'.

'फोन भूत' रिलीज डेट जाहीर
कतरिना कैफने सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाची पोस्ट शेअर करत कतरिनाने लिहिलं की, 'फोन भूतच्या जगात तुमचं स्वागत आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेसृष्टीत दाखल होत आहे.

सिनेमाची स्टार कास्ट
कतरिना कैफने ही पोस्ट शेअर करताच तिचे चाहते या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कतरिनाचा लूक सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीझर झाला रिलीज 
या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला आहे. या 22 सेकंदाच्या टीझरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावता येत नाही. मात्र स्त्री भूताची झलक नक्कीच पाहायला मिळाली आहे.  त्यामुळे आता कतरिना तिच्या चाहत्यांना घाबरवण्यासाठी भूत बनून येत असल्याची अटकळ बांधली जात आहे.