Video: लग्नाला वर्ष झाल्यानंतरही Katrina Kaif का लपवतेय 'ती' गोष्ट? नेटकऱ्यांचा सवाल

Katrina Kaif Pregnancy: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (vicky kaushal and katrina kaif) लग्नाला सध्या एक वर्ष पुर्ण झालं आहे. तेव्हा विकेट हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मध्यंतरी विकी कौशल आणि कतरिनाच्या होणाऱ्या बाळाचीही चर्चा सुरू झाली होती.

Updated: Dec 15, 2022, 03:46 PM IST
Video: लग्नाला वर्ष झाल्यानंतरही Katrina Kaif का लपवतेय 'ती' गोष्ट? नेटकऱ्यांचा सवाल  title=
katrina kaif news

Katrina Kaif Pregnancy: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (vicky kaushal and katrina kaif) लग्नाला सध्या एक वर्ष पुर्ण झालं आहे. तेव्हा विकेट हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मध्यंतरी विकी कौशल आणि कतरिनाच्या होणाऱ्या बाळाचीही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर (social media) सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे तीही पुन्हा एकदा कतरिनाच्या प्रेग्नंन्सीवरूच (pregnancy). सध्या या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यावेळी कारणही तेच आहे. लग्न झाल्यावर जेव्हा विकी आणि कतरिना एकत्र परदेशी फिरू लागले होते तेव्हा कतरिनानं आपलं बेबी बम्प (katrina kaif baby bump) लपवण्यासाठी तसे कपडे घातले आहेत म्हणून तिच्यावर फोटोग्राफर्सचा भडिमार सुरू झाला आणि तिचे फोटोजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागले होते. आता पुन्हा या चर्चांची उजळणी पाहायला मिळते आहे. (Katrina Kaif Gets TROLLED For Looking Pregnant In Body-Hugging Gown at Nykaa Award Netizens Spot Her Baby Bump Marathi News)    

नुकताच नायका ब्यूटी अवॉर्ड हा शो पार पडला. त्यावेळी कतरिनाच्या केबायकतरिना (kay by katrina) या ब्रॅन्डला पुरस्कृत करण्यात आले होते. यावेळी रेड कार्पेटवर कतरिनाची दिलखेचक अदा पाहायला मिळाली. यावेळी ती घातलेल्या ड्रेसमुळे तिच्या बेबी बम्पची चर्चा होऊ लागली आहे आणि आपल्या शिमर असलेल्या गाऊनमध्ये ती आपलं बेबी बम्प लपवत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सगळेच कतरिना प्रेग्नेंन्ट आहे का? असे सवाल नेटकरी आता सोशल मीडियावर विचारू लागले आहेत. त्यामुळे कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्या (pregnancy) चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.     

हेही वाचा - उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

या अवॉर्ड शोमध्ये अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. परंतु सगळ्यांच्या नजरा कतरिना कैफवर खिळल्या होत्या. सगळ्यांनीची तिच्या या व्हिडीओवर तऱ्हेतऱ्हेचे कमेंट्स केले आहेत. या कमेंट्समध्ये कतरिना पुन्हा एकदा प्रेग्नंन्ट असल्याच्या चर्चा आहेत. त्यात अनेक चर्चा अशाही आहेत की कतरिना प्रेग्नेंट नसून ते तिचे बेली फॅट असू शकते. त्यावर अनेकांनी पोझिटिव्ह कमेंट्सही केल्या आहेत. तर अनेकांनी कतरिनाला ट्रोलही केले आहेत. अनेकांनी अशाही कमेंट्स केल्या आहेत कतरिना आई होणार आहे तर अनेक जणांनी असं म्हटलं आहे आता मदर टू बी कतरिना लवकरच आई होणार आहे. परंतु सध्या तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना लवकरच आपल्या आगमी चित्रपटातून दिसणार आहे. येत्या काळात तिचे अनेक फिल्म प्रोजेक्ट्स लाईन्ड अप आहेत. सध्या तिच्या ईशान अख्तर आणि सिध्दांत चतुर्वेदीसोबतच्या फोन भूत (phone bhoot) या आगामी प्रोजेक्टची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचसोबत सलमान खानसोबतच्या आगामी टायगर 3 (tiger 3) या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाचीही प्रेक्षकांनध्ये मोठी उत्सुकता आहे.