'धिक्कार आहे!' Ranvir Singh प्रमाणे आणखी एक अभिनेता विवस्त्र चाहते संतापले

अभिनेत्याचं विवस्त्र फोटोशूट; होतेय रणवीर सिंगसोहत तुलना; अभिनेत्याला अशा अवस्थेत पाहून संतापले चाहते... कमेंट करत म्हणाले, 'धिक्कार आहे!'  

Updated: Dec 15, 2022, 03:17 PM IST
'धिक्कार आहे!' Ranvir Singh प्रमाणे आणखी एक अभिनेता विवस्त्र चाहते संतापले  title=

Aimal Khan Nude Photoshoot: अभिनेता रणवीर सिंगने (Ranvir Singh) विवस्त्र फोटोशूट करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. विवस्त्र फोटोशूटमुळे अभिनेत्याला वादग्रस्त परिस्थितीचा सामना देखील करावा लागला. रणवीरच्या फोटोशूटनंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे विवस्त्र फोटो समोर आले. आता पाकिस्तानी अभिनेत्याने देखील विवस्त्र होवून फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्यावर चाहते संतापले आहेत. रणवीर प्रमाणे फोटोशूट करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आयमल (aimal khan) खान आहे. 
 
आयमल खानचं विवस्त्र फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचं नाव आशना खान आहे. आशना खानने याआधी हानिया आमिर, आयशा उमर, शहरयार मुनव्वर सिद्दीकी आणि माया अली यांचं देखील फोटोशूट केलं आहे. पण आयमल खानच्या विवस्त्र फोटोंनी सर्वत्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. (aimal khan bowling speed)

आयमल खानचं फोटोशूट पाहून अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. एका युजर कमेंट करत म्हणाला, 'असे फोटोशूट करुन आपण फार ग्रेट आहोत असं मॉडेल्सना वाटतं', तर दुसरा युजर म्हणाला, 'धिक्कार आहे...' अशा प्रकारे अभिनेत्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पुढचा रणवीर सिंग....', 'आपण आपल्या शेजारील राष्ट्राला कॉपी केल्याशिवाय राहू शकत नाही का?....' असं देखील युजर्सनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. एवढंच नाही, तर अन्य एका युजने 'चांगलं आहे की मी नेत्रहीन आहे....' असं म्हटलं आहे. सध्या अभिनेत्याच्या विवस्त्र फोटोंमुळे पाकिस्तानमध्ये वातावरण तापलं आहे.  (Entertainment News)

कोण आहे पाकिस्तानी अभिनेता?

आयमल खान हा पाकिस्तानचे उभरता अभिनेता आहे. इंस्टाग्रामवर त्याचे जवळपास 45 हजार फॉलोअर्स आहेत. शिवाय त्याला  2018-19 आणि 2019-20 मध्ये आयमलला सर्वोत्कृष्ट पुरुष मॉडेलचा पुरस्कार मिळाला. एवढंच नाही, तर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर आझाद आणि आयमा बेग आयमलला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.