मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या अफेअरच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच दोघांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कतरिना आणि विकी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंनी या बातमीचा स्विकार करण्यात आलेला नाही.
एका वृत्तानुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानापासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा या रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत. आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नाची तारीख समोर आली आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे चाहते खूप नाराज आहेत की, दोघंही त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृतपणे घोषणा का जाहीर करत नाहीत. ई-टाइम्सच्या वृत्तात असं म्हटलं जात आहे की, कतरिना कैफ सह-अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटामुळे तिच्या लग्नाची घोषणा करत नाहीये. खरंतर, अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बराच काळ रखडला होता. आता निर्माते चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. या सिनेमाला अक्षय कुमारही पूर्ण पाठिंबा देत आहे.
अशा परिस्थितीत जर चित्रपटाची नायिका कतरिनाने तिच्या लग्नाची घोषणा केली असती तर चित्रपटातून लक्ष कतरिना आणि विकीकडे वळलं असतं, अशी भीती निर्मात्यांना वाटत होती. अक्षय कुमार असा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, विकीचे वडील शाम कौशल यांनी या प्रकरणावर पूर्णपणे मौन पाळलं आहे. ही बातमी समजल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. मात्र ते दोघंही कोणालाच उत्तर देत नाहीत. तसंच कतरिना कैफला फक्त खास लोकांचेच फोन येत आहेत.