यासाठी कतरीनाने मागितली विराटची मदत...

सिनेमात क्रिकेटरची भूमिका साकारणार कतरीना.  

Updated: Jan 23, 2019, 07:07 PM IST
यासाठी कतरीनाने मागितली विराटची मदत... title=

 

मुंबई: अभिनेत्री कतरीना कैफ लवकरच सलमान खानच्या 'भारत' सिनेमात झळकणार आहे. सिनेमात ती एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. सिनेमाची शूटिंग त्याचबरोबर ती क्रिकेट खेळण्याचा सराव सुद्धा करत आहे. कतरीनाने अभिनेत्री अनुष्का शर्माचे पति विराट कोहली यांच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी काही टिप्स देण्याची इच्छा व्यक्त केली. तिने सोशल मीडियावर क्रिकेट खेळताना एक व्हिडिओ पोस्ट करत,  अनुष्का शर्मा माझी अशी आशा आहे की तू भारताचे कर्णधार विराट कोहली यांना माझी इच्छा सांगशील त्यामुळे माझ्या खेळात काही सुधार होईल असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर तिने सिनेमा 'गली बॉय' चे गाणे 'अपना टाइम आएगा' असे लिहत आपले कॅप्शन संपवले आहे.

 

काही दिवसांपूर्वी सलमान खानने सुद्धा 'भारत' सिनेमाच्या शूटिंग संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणातच तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bharat Khelega... onlocationstories bharat_thefilm

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

कतरीना 'भारत' सिनेमाच्या शूटिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला, ज्यात कतरीना, सुनील ग्रोवर आणि 'भारत' सिनेमाची टिम जेवताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

लंच ब्रेक #bharat

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

‘एक था टाइगर’आणि‘टाइगर ज़िंदा है’ धमाकेदार सिनेमांनंतर 'भारत' सिनेमात कतरीना कैफ आणि सलमान खान पुऩ्हा एकत्र झळकणार आहेत.